IND vs AUS 2nd ODI: आरोन फिंचचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, असा आहे दोन्ही संघाचा प्लेइंग इलेव्हन

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणारा आजचा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आरोन फिंच (Photo Credit: Getty)

IND vs AUS 2nd ODI: ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात मालिका वाचवण्याचे आव्हानासाठी भारतीय संघ (Indian Team) सज्ज आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) खेळला जाणारा आजचा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने (Aaron Finch) टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केलेला नाही तर ऑस्ट्रेलियामध्ये एक बदल झाला आहे. शुक्रवारी सिडनी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने जबरदस्त खेळ करत भारताला प्रत्येक क्षेत्रात नमवून सामना जिंकला. यजमान संघ एकीकडे सावरत संतुलित आणि प्रबळ दिसला, तर तिन्ही क्षेत्रात विराट आणि कंपनी कमकुवत दिसत होती. अशा स्थितीत आजच्यास सामन्यात त्यांच्यासमोर आपली कामगिरी सुधारण्याचेही आव्हान असणार आहे. (IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि TV Telecast ची संपूर्ण माहिती)

भारताकडून पुन्हा एकदा शिखर धवन आणि मयंक अग्रवालची जोडी सलामीला येईल. धवनकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा असेल तर मयंक आपल्या खेळात सुधार करू पाहत असेल. तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार कोहली देखील या मैदानावरील आपली आकडेवारी सुधारण्याच्या प्रयत्नात असेल. श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्यावर पुन्हा एकदा मधल्या फळीची जबाबदार असेल. दुसरीकडे, मार्कस स्टोइनिसला मागील सामन्यात दुखापत झाल्याने ऑस्ट्रेलिया आजच्या सामन्यात त्याच्या जागी मोईसेस हेनरिक्सचा समावेश केला आहे. आरोन फिंच, डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ, ऑस्ट्रेलियाच्या या त्रिकुटाला रोखण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल.

पाहा ऑस्ट्रेलिया-भारताचा प्लेइंग इलेव्हन:

ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मोईसेस हेनरिक्स, ग्लेन मॅक्सवेल, मार्नस लाबूशेन, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, आणि अ‍ॅडम झांपा.

भारत: शिखर धवन, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल.