IND vs AUS 2020-21: 290 दिवसानंतर टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय कमबॅक, विराट सेना ऑस्ट्रेलिया आव्हानासाठी सज्ज (Watch Video)

टीम इंडिया अखेर मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरली होती. एकीकडे ऑस्ट्रेलियन संघाने कोरोना काळात इंग्लंडचा दौरा केला असून भारतीय संघाचे तब्बल 290 दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक झाले आहे.

टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय कमबॅक (Photo Credit: Instagram)

IND vs AUS 2020-21: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातल्या दौऱ्याला आज, 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. डाऊन अंडर दौऱ्यावर टीम इंडिया (Australia Tour of India) तीन वनडे, तीन टी-20 आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडिया अखेर मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरली होती मात्र तो सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि त्यानंतर कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर संपूर्ण क्रीडा क्षेत्रावर ब्रेक लागला. मार्च महिन्यात आयोजित होणारे आयपीएल देखील स्थगित करण्यात आले जे नंतर टी-20 वर्ल्ड कप पुढील वर्षापर्यंत स्थगित केल्यावर सप्टेंबर-नोव्हेंबर दरम्यान युएई येथे आयोजित करण्यात आले. आयपीएल संपुष्टात येताच भारतीय संघ (Indian Cricket Team) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला आणि आज दोन्ही संघात दौऱ्यावरील पहिला वनडे सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) खेळला जात आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियन संघाने कोरोना काळात इंग्लंडचा दौरा केला असून भारतीय संघाचे तब्बल 290 दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक झाले आहे. (IND vs AUS 2020-21: इशांत शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट मालिकेतून आऊट, रोहित शर्माच्या खेळण्यावर 11 डिसेंबर रोजी होणार निर्णय)

तब्बल 8 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या टीम इंडियापुढे ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाच्या 2018-19 दौऱ्यावर भारताने वनडे आणि कसोटी मालिका जिंकली असली यंदा त्यांच्यासाठी हा दौरा कठीण सिद्ध होऊ शकतो. मर्यादित ओव्हर मालिकेत रोहित शर्माची अनुपस्थिती, स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांचे ऑस्ट्रेलियन संघात आगमनाचा भारतीय संघावर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ शेअर केला, पाहा:

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

दरम्यान, सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जनावर सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवनसोबत मयंक अग्रवाल सलामीला येईल असे कर्णधार विराट कोहलीने सांगितले. रोहितच्या जागी यंदा ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहेत. दौऱ्यावर यंदा राहुल फलंदाज आणि विकेटकीपरची भूमिका बजावताना दिसेल.