IND vs AUS 2020-21 Series: संजय मांजरेकर यांची भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या कमेन्ट्री पॅनेलमध्ये एंट्री, पाहा संपूर्ण लिस्ट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्या आगामी मालिकेत ते कमेंट्री बॉक्समध्ये दिसणार आहेत. त्यांना इंग्रजी कमेंटरी पॅनेलमध्ये सामील करण्यात आले आहेत.
Sanjay Manjrekar Returns to Commentary Panel: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध भाष्यकार संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांची पुन्हा एकदा बीसीसीआयच्या कमेन्टरी पॅनेलमध्ये (BCCI Commentary Panel) एंट्री झाली आहे. भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात खेळल्या जाणार्या आगामी मालिकेत ते कमेंट्री बॉक्समध्ये दिसणार आहेत. त्यांना इंग्रजी कमेंटरी पॅनेलमध्ये सामील करण्यात आले आहेत. यावर्षी मार्च महिन्यात मांजरेकरांना बीसीसीआयने (BCCI) बाहेरचा रास्ता दाखवला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मांजरेकर व्यतिरिक्त हर्षा भोगले, अजय जडेजा, मुरली कार्तिक आणि अजित आगरकर देखील या पॅनेलमध्ये आहेत. त्याचबरोबर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि झहीर खानसारखे (Zaheer Khan) माजी दिग्गज क्रिकेटपटू हिंदी कमेंटरी पॅनेलमध्ये आहेत. (IND vs AUS 2020-21 Live Telecast: कधी आणि कुठे बघता येईल भारत-ऑस्ट्रेलिया वनडे, टी-20 आणि टेस्ट मॅचचं लाईव्ह प्रक्षेपण; जाणून घ्या प्रत्येक अपडेट)
दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि चार कसोटी सामन्यांचे अधिकृत प्रसारक असणाऱ्या सोनी पिक्चर्स नेटवर्कने हाय-व्होल्टेज मालिकेच्या कमेंटरी पॅनेलची घोषणा केली आणि मांजरेकरांच्या नावाची पुष्टी केली. आयपीएल 2020 सुरू होण्यापूर्वी संजय मांजरेकर यांनी बीसीसीआयला पुन्हा कामावर आणण्याची विनंती केली होती, पण सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने त्यांची विनंती मान्य केली नाही. तथापि, आता माजी क्रिकेटपटू भारताच्या आगामी सामन्यात कमेंटरी करण्यासाठी सज्ज आहेत. ग्लेन मॅकग्रा आणि निक नाइट या मालिकेसाठी इंग्लिशचे दोन भाष्यकार आहेत. सेहवागने देखील कमेंट्री बॉक्समध्येही पुनरागमन केले आणि ते मोहम्मद कैफ, विजय दहिया, विवेक रज्दान, अर्जुन पंडित आणि झहीर खान यांच्यासह हिंदी भाषेत आपले मत मांडताना दिसतील.
मांजरीरेकरांची हकालपट्टी करण्याबाबत कोणतेही ठोस कारण बीसीसीआयने दिले नसले, तरी त्यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे मंडळ प्रभावित झाले नाही हे स्पष्ट आहे. मांजरेकर यांनी 2019/20 हंगामात काही वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत होते, त्यानंतर ते बीसीसीआयच्या रडारवर आले होते. रवींद्र जडेजाला 'बिट्स अँड पीस' क्रिकेटपटू म्हणण्यापासून हर्षा भोगले यांच्याबरोबर लाईव्ह वादात सामील होणे माजी भारतीय फलंदाजाला महागात पडले.