IND vs AUS 2020-21 Series: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट मालिकेत कोणत्या कोणत्या क्रमांकावर बॅटिंग करणार? रोहित शर्माने केलं स्पष्ट 

आयपीएल दरम्यान दुखापत झालेला रोहित सध्या बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पूर्ण फिटनेस मिळवण्यासाठी घाम गाळात आहे.

रोहित शर्मा (Photo Credits: IANS)

IND vs AUS 2020-21 Series: रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटी सलामीवीर म्हणून आपल्या भूमिकेचा आनंद लुटला आहे, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) आगामी कसोटी मालिकेत संघ व्यवस्थापनाच्या मागणीनुसार फलंदाजी क्रमवारीत त्याच्या स्थानाबाबत लवचिक होण्यास 'हिटमॅन' सज्ज आहे. आयपीएल (IPL) दरम्यान दुखापत झालेला रोहित शर्मा सध्या बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (National Cricket Academy) पूर्ण फिटनेस मिळवण्यासाठी घाम गाळात आहे. आयपीएल दरम्यान मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्यामुळे रोहित वनडे आणि टी-20 सीरिजला मुकणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितला पहिले वगळण्यात आले, पण नंतर सुधारित कसोटी संघात त्याला स्थान देण्यात आले. पहिल्या टेस्टनंतर कर्णधार विराट कोहली भारतात परतणार आहे, त्यामुळे रोहितला उपकर्णधार अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासोबत मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. रोहितने पीटीआयला सांगितले की, "संघाला जिथे हवे तेथे मी फलंदाजी करण्यास इच्छुक आहे, पण सलामी फलंदाज म्हणून माझी भूमिका बदलेल की नाही हे मला माहित नाही." (IND vs AUS 2020-21: रोहित आणि इशांत शर्मा यांना प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा अल्टीमेटम, 3-4 दिवसांत ऑस्ट्रेलिया पोहचण्याची दिली ताकीद)

रोहित म्हणाला की, विराट परतल्यानंतर पर्यायी खेळाडूंचा विचार टीम प्रशासनाने नक्कीच केला असेल. तिकडे पोहोचल्या नंतरच टीमला मी कोणत्या क्रमांकावर खेळण्यासाठी हवा आहे, ते स्पष्ट होईल. त्यांना पाहिजे त्या क्रमांकावर मी खेळण्यास करायला तयार आहे. हुक आणि पुश शॉट्स खेळणाऱ्या उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक, रोहितचे मत आहे की ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवरील बाउन्स तितका मोठा घटक कधी बनत नाही जितकं त्याला बनवलं जातं. हिटमॅन म्हणाला की, "आम्ही गेल्या काही वर्षांत पर्थ वगळता काही वर्षात ऍडलेड, मेलबर्न आणि सिडनीमध्ये बॉलने एवढी उसळी घेत नाही."

रोहितने पुढे म्हटले की, :ओपनिंग करायची असेल, तर मला कट आणि पूल शॉट मारण्याबाबत विचार करावा लागेल. जेवढं शक्य आहे तेवढा वेळा मला व्ही मध्ये आणि सरळ शॉट मारावे लागतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेची सुरुवात 27 नोव्हेंबर रोजी वनडे मालिकेने होईल, तर 17 डिसेंबर रोजी कसोटी मालिका खेळली जाईल. दोन्ही देशातील पहिला सामना गुलाबी चेंडूने म्हणजे दिवस/रात्र सामना खेळला जाणार आहे.