IPL Auction 2025 Live

‘Why Do Virat Kohli & Rohit Sharma Fans Dislike Each Other So Much?’ विराट कोहली-रोहित शर्मावरील ऑस्ट्रेलियन पत्रकाराच्या प्रश्नावर Netizens मध्ये ट्विटर वॉर

ज्यावर दुसऱ्यापेक्षा कोण चांगला आहे हे स्पष्टीकरण देत क्रिकेट चाहत्यांनी मिनी-वॉर सुरु केलं. 

विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credit: Getty)

IND vs AUS 1sr Test: विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) निःसंशयपणे आधुनिक काळातील क्रिकेटमधील दोन सर्वोत्तम फलंदाज आहेत आणि त्यांचे रेकॉर्डस् त्यांच्या खेळीची ग्वाही देतात. या दोंघांमध्ये भागीदारीने गेल्या काही वर्षांत भारताला बरेच अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत, तर गेल्या वर्षातील वर्ल्ड कप स्पर्धेपासून या दोन फलंदाजांमधील वाद निर्माण झाला असल्याचे वृत्त समोर येत आहे. या दोन्ही फलंदाजांमधील 'वास्तविक GOAT कोण आहे' या प्रश्नाचे उत्तर अद्याप कोणीही देऊ शकलेलं नाही. या दोन दिग्गज फलंदाजांचे चाहतेदेखील त्यांच्या कामगिरीच्या जोरावर एकमेकांसोयाबीत वाद-विवाद करताना दिसतात. या दरम्यान, ऑस्ट्रेलियन पत्रकार अमांडा बेली यांनी (Chloe Amanda Bailey) या दोन फलंदाजांच्या चाहत्यांमध्ये झालेल्या लढाईवर प्रश्नचिन्ह लावत लोकांना सवाल केला. "विराट कोहली आणि रोहित शर्मा चाहते एकमेकांना इतके का आवडत नाहीत? ते दोन्ही भारतीय आहेत? कृपया मला स्पष्टीकरण हवे आहे," असे ट्विट बेली यांनी केले. (IND vs AUS 1st Test Day 1: 'ये तो होना हि था'! मिचेल स्टार्कने केली पृथ्वी शॉ याची दांडी गुल, ट्विटरवर आला भन्नाट Memes चा पाऊस)

त्यांनी बॉलीवूडची एक मिमही शेअर केली. यामध्ये नासरुद्दीन शाह 'हा गुन्हा आहे," असे बोलताना दिसत आहे. तिचे ट्विटने मात्र पांडोराच्या बॉक्स उघडला आणि दुसऱ्यापेक्षा कोण चांगला आहे हे स्पष्टीकरण देत क्रिकेट चाहत्यांनी मिनी-वॉर सुरु केलं. अमांडाचे हे ट्विट लवकरच सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहे. अनेकांनी आकडेवारीसह त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाठिंबा दर्शविला असता, अनेकांनी असा दावा केला की एकाला दुसर्‍याचा हेवा वाटतो. हे बघा!

चोल आमंडाचे ट्विट!! 

रोहितला ईर्ष्या!!

व्यंग!!

मिम्स

आयपीएल, कारण!

विराट कोहलीचे विक्रम!!

आनंददायक

रोहित शर्मा सर्वोत्कृष्ट कर्णधार?

काही स्पष्टीकरण!!

दुसरीकडे, विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अ‍ॅडिलेड ओव्हल येथे सुरु असलेली कसोटी मालिका खेळत आहेत, तर रोहित शर्मा आपल्या दुखापतीतून सावरत आणि एमसीएमध्ये फिटनेस टेस्ट पास करत ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. रोहितला आता इथे 14 दिवस क्वारंटाइन राहणार असून अंतिम दोन कसोटी सामन्यात खेळणे अपेक्षित आहे.