IND vs AUS 1st Test: स्टीव्ह स्मिथच्या दुखापतीवर ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेनने दिला मोठा अपडेट, पहिल्या टेस्ट मॅचपूर्वी पाहा काय म्हणाला

त्यामुळे, स्मिथ पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध असेल की नाही? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनने स्टीव्ह स्मिथच्या दुखापतीबाबत मोठा अपडेट दिला आहे.

स्टीव्ह स्मिथ (Photo Credit: Getty Images)

Steve Smith 'Sore Back' Update: भारत (India) आणि यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) संघ 17 डिसेंबरपासून होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी कसून तयारी करत आहेत. 15 डिसेंबर रोजी झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या सराव सत्रात संघाचा विस्फोटक फलंदाज स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) कंबरेवर सूज आल्यामुळे गैरहजर असल्याचे म्हटले जात आहे. गुलाबी चेंडूने पहिला कसोटी सामना खेळण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ (Australian Cricket Team) सतत त्यांच्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. डेविड वॉर्नर यापूर्वी पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे, तर स्मिथला सराव सत्र मध्यभागी सोडून बाहेर पडावे लागले. त्यामुळे, स्मिथ पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध असेल की नाही? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनने (Tim Paine) स्टीव्ह स्मिथच्या दुखापतीबाबत मोठा अपडेट दिला आहे. (IND vs AUS 1st Test 2020: टीम इंडिया कंबर कसून तयार, पहिल्या टेस्ट मॅचपूर्वी नेट्समध्ये गाळला घाम Watch Video)

पत्रकारांशी संवाद साधताना पेन म्हणाला की, डेव्ह (डेविड वॉर्नर) उपलब्ध होणार नाही, परंतु आम्ही आशा करतो की स्मिथ उपलब्ध असेल. यापूर्वीही बर्‍याच वेळा स्मिथला पाठीची समस्या जाणवत होती आणि जेव्हा आपण त्याच्यासारखे प्रशिक्षण घेतो तेव्हा असे होते. त्याची तयारी खूप चांगली आहे आणि उद्याचा ब्रेक त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. काल अधिक खबरदारीचा दिवस होता. तो आज प्रशिक्षण घेईल, आम्ही पाहू की तो कसा प्रतिसाद देतो. पण उद्या या, जरी तो तंदुरुस्त आहे किंवा मागे घसा आहे, किंवा मागे कडक आहे, मला असे वाटते की सामान्यतः जर त्याच्या पाठीत त्रास होत असेल तर तो सहसा त्यातून बाहेर पडतो आणि धावा करण्याचा मार्ग शोधतो."

यावर्षी जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत उतरलेला संघ पहिल्या कसोटी सामन्यात जाणार असल्याचे ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधाराने सांगितले. तो म्हणाला की आता आमच्याकडे चांगली टीम आहे. पेन म्हणाला की, अष्टपैलू म्हणून संघ कॅमरून ग्रीनला संधी देईल आणि आपली क्षमता दर्शविण्याची पूर्ण संधी त्याला मिळेल. दरम्यान, वॉर्नर आणि विल पुकोव्हस्की यांच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियाने सलामी संयोजनाविषयी अद्याप निर्णय घेतलेला नाही.