IND vs AUS 1st Test Playing XI: अॅडिलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिंक-बॉल कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन जाहीर, ‘या’ खेळाडूंना दिले स्थान
गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे. मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ भारताची सलामी जोडी म्हणून मैदानावर उतरतील. तर संघात रिद्धिमान साहाने विकेटकीपर-फलंदाज म्हून स्थान मिळवेल आहे.
IND vs AUS 1st Test Playing XI: अॅडिलेड ओव्हल (Adelaide Oval) मैदानावर उद्या, म्हणजेच 17 डिसेंबरपासून भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) संघात कसोटी मालिकेला सुरुवात होंत आहे. गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे. बीसीसीआयने (BCCI) बुधवारी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही घोषणा केली. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना पाठिंबा, भारताची सलामी जोडी, विकेटकीपर आणि तिसरा वेगवान गोलंदाज यांच्याबद्दल बरीच चर्चा झाली. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) भारताची सलामी जोडी म्हणून मैदानावर उतरतील. तर कर्णधार कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर संघाच्या मधल्या फळीची जबाबदारी असेल. या शिवाय संघात रिद्धिमान साहाने विकेटकीपर-फलंदाज म्हून स्थान मिळवेल आहे. (IND vs AUS 1st Test: विराट कोहलीच्या रडारवर सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग यांचे विक्रम; माजी Aussie कर्णधाराला पछाडत वर्ल्ड रेकॉर्डची संधी)
आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर गोलंदाजी विभागाची जबाबदारी असेल. लक्षात घेण्यासारखे म्हणजे भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शुभमन गिल रिषभ पंतला (Rishabh Pant) डच्चू दिला. शुभमनच्या सलामीला जागी पृथ्वी तर पंत ऐवजी टीम इंडियाने विकेटकीपर-फलंदाजाच्या भूमिकेसाठी रिद्धीमान साहाला पसंती दिली. तत्पूर्वी, भारतीय संघ कसोटी मालिकेच्या तयारीसाठी रहाणेच्या नेतृत्वात दोन तीन दिवसीय सराव सामने खेळला. दुसरा सामना गुलाबी चेंडूने खेळला असून विराट सामन्यातून बाहेर बसला तर विहारी आणि पंतने शतकी खेळी केली. विराट कोहली आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मास उपस्थित राहण्यासाठी पहिल्या कसोटीनंतर भारतात परत येईल आणि कर्णधाराने बुधवारी पत्रकार परिषदेत पुष्टी केली की उपकर्णधार अजिंक्य रहाणे त्याच्या अनुपस्थितीत उर्वरित तीन कसोटी सामन्यांत नेतृत्व करेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी भारताचा इलेव्हन: मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.