IND vs AUS 1st Test Day 3 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅडिलेड टेस्ट मॅच लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग व TV Telecast ची संपूर्ण माहिती
तिसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरु होईल. भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवस/रात्र कसोटी सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी सिक्स नेटवर्क आणि डीडी स्पोट्स वर उपलब्ध असेल.
IND vs AUS 1st Test Day 3 Live Streaming: यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्यातील अॅडिलेड ओव्हल (Adelaide Oval) येथील पहिल्या पिंक-बॉल कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. दुसऱ्या फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडे (Indian Team) सामन्यात आघाडी घेण्याची संधी आहे. रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 191 धावांवर रोखलं. पहिल्या डावात भारतीय संघानं 53 धावांची आघाडी घेतली होती, त्यामुळे आजच्या दिवशी विराट कोहलीची टीम इंडिया (Team India) मोठी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल. तिसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरु होईल. भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवस/रात्र कसोटी सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी सिक्स नेटवर्क आणि डीडी स्पोट्स वर उपलब्ध असेल. शिवाय, Sony LIVवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. (IND vs AUS 1st Test Day 2: दुसऱ्या दिवसाखेर भारताकडे धावांची आघाडी, पृथ्वी शॉ दुसऱ्या डावातही फेल)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात भारताने टॉस जिंकून फलंदाजी करत पहिल्या डावात 244 धावांपर्यंत मजल मारली. दुसरीकडे मात्र, यजमान संघ प्रभावी खेळी करू शकला नाही. भारताच्या भेदक गोलंदाजीमुळे सामना रंगतदार स्थतीत पोहचला आहे. कर्णधार टीम पेनचं अर्धशतक आणि मार्नस लाबूशेनच्या झुंजार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्वतःवरची नामुष्की टाळली. भारताकडून पहिल्या डावात रविचंद्रन आश्विनने 4, उमेश यादवने 3 जसप्रीत बुमराहने 2 बळी घेतले. आता दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांकडून प्रभावी फलंदाजीची अपेक्षा असेल, तर ऑस्ट्रेलियन गोलंदाज आक्रमक टीम इंडिया फलंदाजांचा सामना कसा करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पाहा ऑस्ट्रेलिया-भारताचा अॅडिलेड कसोटीसाठीचा प्लेइंग इलेव्हन
भारत: मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया: टिम पेन (कॅप्टन/विकेटकीपर), जो बर्न्स, मॅथ्यू वेड, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, ट्रॅव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, आणि नॅथन लायन.