IND vs AUS 1st Test Day 1: अ‍ॅडिलेडमध्ये विराट कोहलीचा 'किस्मत कनेक्शन', चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले सर्वाधिक चेंडू, पहा मॅचमध्ये बलेले प्रमुख रेकॉर्डस्

ऑस्ट्रलिया आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी बनलेले 'हे' काही आकडा पहा.

विराट कोहली, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 1st टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs AUS 1st Test Day 1: यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतीय संघात (Indian Team) अ‍ॅडिलेड ओव्हलमधील (Adelaide) पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आणि भारताने पहिले फलंदाजी करून 6 बाद धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक 74 धावा केल्या तर चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) 43 आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 42 धावांचे योगदान दिले. अ‍ॅडिलेडमध्ये विराटचा 'किस्मत कनेक्शन' पुन्हा संघाच्या कामी आला. विराटने कसोटी कारकिर्दीतील 23वे अर्धशतक करत पहिले पुजारा आणि नंतर रहाणेसोबत अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. अ‍ॅडिलेड मैदान विराटसाठी खूप खास आहे आणि त्याने पुन्हा एकदा येऊ सिद्ध केलं. दुसरीकडे, पुजाराने देखील कांगारू संघाविरुद्ध एका खास विक्रमाची नोंद केली. पुजाराने दिवसाच्या तिसऱ्याच चेंडूचा सामना करण्यासाठी मैदानावर आला आणि त्याने जबाबदारीने बॅटिंग करत संघाचा डाव सांभाळला. (IND vs AUS 1st Test Day 1: विराट कोहलीचे दमदार अर्धशतक, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा अचूक मारा; भारत पहिल्या दिवसाखेर 6 बाद 233 धावा)

ऑस्ट्रलिया आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी बनलेले 'हे' काही आकडा पहा.

1. गेल्या दशकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत कोणत्याही फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक बॉलचा सामना करण्याचा विक्रम चेतेश्वर पुजाराने गुरुवारी आपल्या नावावर केला. पुजाराला आता गेल्या दशकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 28 डावांमध्ये आजवर 3,609 चेंडूंचा सामना केला आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने 466 डावात 3607 चेंडूंचा तर अ‍ॅलिस्टर कुकने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांविरुद्ध 40 डावात 3274 चेंडूंचा सामना केला आहे.

2. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात कोहलीने पहिल्या डावात अर्धशतक ठोकले असून या मैदानावरील हे त्याचे चौथे अर्धशतक आहे. या मदैनावर सर्वाधिक अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटने संयुत्तकपणे दुसरे स्थान पटकावले. वेस्ट इंडिजचे महान विवियन रिचर्ड्स यांनी अ‍ॅडिलेडवर सर्वाधिक 6 अर्धशतक केली आहेत.

3. अ‍ॅडिलेड कोहलीचे सर्वात आवडते मैदान असून त्याने अन्य कोणत्याही मैदानापेक्षा या ठिकाणी सर्वात जास्त धावा केल्या आहेत. विराटने इथे 839 धावा केल्या आहेत.

4. विराट आपल्या कसोटी कारकिर्दीत दोन वेळा धावबाद झाला आहे. आणियोगायोग म्हणजे दोन्ही वेळा तो अ‍ॅडिलेडवर रनआऊट झाला आहे. 2012 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चौथ्या कसोटीत विराटला हिलफेनहॉसने धावबाद केले होते.

5. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात कसोटी क्रिकेटमधलं 23वं अर्धशतक झळकावलं. या अर्धशतकी खेळीदरम्यान विराटने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आणि धोनीच्या 813 धावांच्या विक्रमला मागे टाकलं.

6. कसोटी क्रिकेटमध्ये 50 वेळा 50 हुन अधिक धावा करणारा आठवा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल, तर राहुल द्रविड, सुनील गावस्कर, व्हीव्हीस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, दिलीप वेंगसरकर आणि सौरव गांगुली यांचा समावेश आहे.

दरम्यान, भारताकडून पहिल्या दिवसाखेर रिद्धिमान साहा नाबाद 9 आणि रविचंद्रन अश्विन नाबाद 15 धावा करून परतले. शिवाय, ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कला  सर्वाधिक 2 तर पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.