IND vs AUS 1st Test 2020: जड अंतःकरणाने मायदेशी परतणार विराट कोहली, टीम इंडियाच्या पराभवावर हताश शब्दांत दिली प्रतिक्रिया
या पराभवानंतर विराटने हताश शब्दांत प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला की तो जाड अंतःकरणाने मायदेशी परतणार आहे. व्हर्च्युअल सादरीकरणात विराट म्हणाला की, "सामना जिंकला असेल तर मला खरंच ते आवडलं असतं."
IND vs AUS 1st Test 2020: भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील पहिला कसोटी सामना संपुष्टात आला आहे आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आता मायदेशी परतण्यासाठी सज्ज होत आहे. पराभव म्हणजे पराभव असतो, परंतु अॅडिलेड ओव्हलच्या (Adelaide Oval) मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून मिळालेला पराभव अनेक प्रकारे वेदनादायी आहे. या सामन्यापूर्वी कोहली भारतासाठी एक लकी चार्म होता. 2015 याच मैदानावरील कसोटीपूर्वी कोहलीने कसोटी सामन्यात जेव्हा-जेव्हा नाणेफेक जिंकली तेव्हा भारताने एकही सामना गमावला नाही, पण 25 सामन्यांनंतर कोहलीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदाच सामना गमावला आहे. या पराभवानंतर विराटने हताश शब्दांत प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला की तो जाड अंतःकरणाने मायदेशी परतणार आहे. (IND vs AUS 1st Test 2020: वसीम जाफर यांनी अॅडिलेड सामन्यातील भारताच्या दयनीय स्थितीवर पोस्टने व्यक्त केली प्रत्येक चाहत्यांची व्यथा, पहा Tweet)
भारताने कसोटी सामन्यात सर्वात कमी 36 धावसांख्येची नोंद केल्यानंतर व्हर्च्युअल सादरीकरणात विराट म्हणाला की, "सामना जिंकला असेल तर मला खरंच ते आवडलं असतं. विजयासह जाणे चांगले झाले असते, पण हे टेस्ट क्रिकेट आहे, कोणत्याही टप्प्यावर काहीही घडू शकते. मला खात्री आहे की मेलबर्नमध्ये संघ जोरदार पुनरागमन करेल." मेलबर्न कसोटी सामन्याबद्दल बोलताना विराटने पुढे म्हटले, "त्यांच्यातले आपले खरे कौशल्य ओळखतात आणि ते संघात कसे उभे राहू शकतात माहिती आहे. मला खात्री आहे की आपण यातून शिकू. मला असे वाटत नाही की आमच्याकडे फलंदाजीची कामगिरी कधी खराब झाली आहे म्हणूनच आम्ही येथून पुढे जाऊ आणि समजू शकतो की जेव्हा आम्ही भागीदारीचा विचार करतो आणि एकत्र फलंदाजीचा विचार करतो तेव्हा संघ म्हणून विशेष कामगिरी करू शकतो."
सामन्यादरम्यान मोहम्मद शमीच्या हाताला दुखापत झाली होती आणि आता जर शमीची दुखापत गंभीर असेल तर दुसर्या कसोटीत खेळणे त्याला अवघड असेल, जे संघासाठी मोठा धक्का सिद्ध होऊ शकतो. संध्याकाळपर्यंत भारतीय संघ व्यवस्थापन शमीचे स्थिती स्पष्ट करतील. कर्णधार विराटने देखील सांगितले की शमीच्या दुखापतीबद्दल तो सध्या जास्त काही सांगू शकत नाही. त्याने म्हटले की शमीच्या हात स्कॅन करावा लागेल आणि त्यानंतरच नेमकी परिस्थिती समोर येईल.