IPL Auction 2025 Live

IND vs AUS 1st Test 2020: वसीम जाफर यांनी अ‍ॅडिलेड सामन्यातील भारताच्या दयनीय स्थितीवर पोस्टने व्यक्त केली प्रत्येक चाहत्यांची व्यथा, पहा Tweet

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी अत्यंत वाईट कामगिरी केली. यादरम्यान माजी प्रथम श्रेणी क्रिकेटर वसीम जाफर यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली जी अ‍ॅडिलेडच्या दुसऱ्या डावात भारताची स्थिती पाहून प्रत्येक चाहत्यांची व्यथा व्यक्त करते.

वसीम जाफर यांची अ‍ॅडिलेड सामन्यातील भारताच्या स्थितीवरील पोस्ट (Photo Credit: PTI)

IND vs AUS 1st Test 2020: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्यातील अ‍ॅडिलेड (Adelaide) येथील पिंक-बॉल कसोटी (Pink-Ball Test) सामना नुकताच संपुष्टात आला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी अत्यंत वाईट कामगिरी केली. यादरम्यान मोहम्मद शमीला फलंदाजी करताना दुखापत झाली त्यानंतर भारताने आपला डाव 9 बाद 36 धावांवरच घोषित केला, त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी 90 धावांचे लक्ष्य मिळाले  जे त्यांनी 8 विकेट राखून गाठले. यासह ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. भारताच्या फलंदाजीने अशा दयनीय स्थितीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांसह दिग्गजांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. या दरम्यान माजी प्रथम श्रेणी क्रिकेटर वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली जी अ‍ॅडिलेडच्या दुसऱ्या डावात भारताची स्थिती पाहून प्रत्येक चाहत्यांची व्यथा व्यक्त करते. (IND vs AUS 1st Test Day 3 Stats: टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवाने विराट कोहलीची 'ती' मालिका खंडित, पाहा पिंक-बॉल टेस्टच्या तिसऱ्या दिवसाचे प्रमुख आकडे)

जाफर यांनी लिहिले, "कधीकधी अफाट आनंद कसा अपार दुःखामध्ये परिवर्तित होतो, मी आज तो अनुभवलं." यामागील कारण असे की पहिल्या डावात 244 धावा करून भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 191 धावांवर रोखलं आणि दुसऱ्या दिवसाखेर 53 धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवशी 1 बाद9 धावांपासून त्यांनी पुढे खेळण्यास सुरुवात केली, मात्र रात्रीच्या जेवणापूर्वी संघाने 9 बाद 36 धावांवर डाव घोषित केला आणि आपल्या कसोटी इतिहासातील सर्वात छोटी धावसंख्या नोंदवली. त्यामुळे, फक्त दिग्गज क्रिकेटपटूच नाही तर प्रत्येकी भारतीय चाहत्याची निराशा झाली. कारण एकेवेळी आघाडीवर असलेल्या टीम इंडियाचा डाव पट्ट्यांच्या घरासारखा विखुरला.

दरम्यान, पहिल्या सामन्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आता बॉक्सिंग डे टेस्ट मॅचच्या तयारीला लागतील. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 26 ते 30 डिसेंबर दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळला जाईल. या सामन्यासाठी दोन्ही संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. एकीकडे, डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलियन संघात सामील होऊ शकतो तर विराट कोहली मायदेशी परतणार आहे. विराट आणि पत्नी अनुष्का शर्मा यांना जानेवारी 2021 मध्ये पाहिलं बाळ होणार असल्याने भारतीय कर्णधार पॅटर्निटी रजेवर असेल.