IND vs AUS 1st Test 2020: ‘बूम बूम’ बुमराह! भारतीय गोलंदाजला चीअर करण्यासाठी अ‍ॅडिलेड ओव्हलमध्ये आला त्याचा छोटा फॅन, पहा क्युट Video

स्टँडमधील एक गोंडस मुलगा जसप्रीत बुमराहचा फॅन असून स्वतःला भारतीय गोलंदाजासाठी चीअर करताना दिसला.

जियान आणि जसप्रीत बुमराह (Photo Credits: Facebook)

IND vs AUS 1st Test 2020: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात पहिला पिंक-बॉल टेस्ट सामना खेळला जात असताना अ‍ॅडिलेड ओव्हलच्या (Adelaide Oval) स्टॅन्डमध्ये जियान (Jiyaan) नावाच्या सुपर क्युट चाहत्याने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले. स्टँडमधील एक गोंडस मुलगा जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) फॅन असून स्वतःला भारतीय गोलंदाजासाठी चीअर करताना दिसला. बुमराहने ज्या प्रकारची गोलंदाजी करतो त्यावरून हे स्पष्ट आहे की जगभरात त्याचे चाहते असतील. दरम्यान, जियान त्याच्या वडिलांसोबत आला होता जे त्याच्या शेजारी बसले होते तर अन्य कोणीतरी त्याचा व्हिडिओ शूट केला. बुमराहने ऑस्ट्रेलियन डावात एकूण 2 विकेट घेतल्या आणि कांगारू संघाच्या अडचणीत वाढ केली. जो बर्न्स आणि मॅथ्यू वेड यांच्या सलामी जोडीला बुमराहने माघारी धाडलं त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी विकेट घेण्याचे सत्र सुरु केले.

भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज चांगला खेळ करू शकले नाही आणि पहिल्या डावात 191 धावाच करू शकले. कर्णधार टिम पेनने सर्वाधिक 73 धावा केल्या, तर मार्नस लाबूशेनने संयमी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बुमराहने 21 ओव्हर गोलंदाजी करत 7 मेडन ओव्हर टाकले आणि 2.48 च्या इकॉनॉमी रेटने 52 धावा दिल्या. तर एकूणच बुमराहसाठी गोलंदाजीने खेळपट्टीवर एक चांगला दिवस होता. इतकंच नाही तर बुमराह दुसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण होण्यापूर्वी नाइट वॉचमन म्हणून तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी मैदानावर उतरला आणि सर्वांना चकित केलं. बुमराहच्या या छोट्या फॅनच्या या व्हिडिओवर एक नजर टाकूया:

दुसरीकडे, सोशल मीडियावर फॅनचा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. वर्ल्ड कप 2019 दरम्यान 87-वर्षीय फॅन चारुलता पटेल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्या भारतीय संघासाठी जयजयकार करतील होत्या. त्यावेळी सौरव गांगुलीने दिवंगत फॅनचे कौतुक केले होते तर खेळानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी त्यांची भेट देखील घेतली होती.



संबंधित बातम्या

IND vs AUS 5th Test 2025: ज्यांच्याकडून होती चांगल्या कामगिरीची अपेक्षा त्यांनीच केली निराशा, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील हे 5 खेळाडू ठरले पराभवाचे दोषी

New Zeland Beat Sri Lanka 1st ODI 2025 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 9 गडी राखून केला पराभव, विल यंगची 95 धावांची मॅच विनिंग खेळी; वाचा सामन्याचे स्कोअरकार्ड

Australia Qualify WTC Final 2025: ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मारली धडक, दक्षिण आफ्रिकेशी होणार सामना; नवीन वर्षात टीम इंडियाचा प्रवास संपुष्टात

AUS Beat IND 5th Test 2025 Day 3 Scorecard: सिडनीमध्ये भारताचा सहा विकेट्स राखून पराभव, ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका जिंकली; भारताचे WTC फायनलचे स्वप्न भंगले