IND vs AUS 1st T20I: आरोन फिंचचा टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय, टीम इंडियासाठी वनडेनंतर नटराजनचे टी-20 डेब्यू

यॉर्कर स्पेशलिस्ट टी नटराजनला या सामन्यातून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली आहे. यापूर्वी, नटराजनने तिसऱ्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकले होते.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 1st टी-20 (Photo Credit: Instagram)

IND vs AUS 1st T20I: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातल्या वनडे सीरिजनंतर आता टी-20 सीरिजला सुरुवात होणार आहे. कॅनबेराच्या मनुका ओव्हल मैदानावर खेळल्या जाणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने (Aaron Finch) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वनडे सीरिजमध्ये 2-1 ने पराभव झाल्यानंतर आता टी-20 सीरिजमध्ये या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने मजबूत प्लेइंग इलेव्हन निवडला आहे. दोन्ही संघात मोठे फटकेबाजी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे, त्यामुळे सामना मजेदार ठरेल होण्याची चिन्ह दिसत आहेत. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या यॉर्कर स्पेशलिस्ट टी नटराजनला या सामन्यातून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली आहे. यापूर्वी, नटराजनने तिसऱ्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकले होते. शिवाय, शिखर धवनसोबत केएल राहुल सलामीला येईल. राहुलने वनडे माळियेक्त मधल्या फळीत फलंदाजी केली होती. (IND vs AUS: पहिल्या टी-20 पूर्वी टीम इंडिया खेळाडूंची आऊटींग! हार्दिक पांड्या, विराट कोहलीने घेतला ‘Beautiful Sunny Canberra’ चा आनंद, पाहा Photo)

भारताने आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधून श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवला वगळले आहे. मनीष पांडे, संजू सॅमसन, दीपक चाहर आणि वॉशिंग्टन सुंदरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासाठी डेविड वॉर्नरच्या अनुपस्थितीत डार्सी शॉर्ट कर्णधार आरोन फिंचसह डावाची सुरुवात करेल. तिसऱ्या वनडे सामन्यातून वगळण्यात आलेल्या मिशेल स्टार्कचा टी-20 सामन्यासाठी समावेश करण्यात आला आहे. स्टिव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर जबाबदारी संभातील. अ‍ॅलेक्स कॅरीच्या जागी मॅथ्यू वेडचा विकेटकीपर-फलंदाज म्हणून समावेश झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

पाहा ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाचा प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया: डार्सी शॉर्ट, आरोन फिंच (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), मोईसेस हेनरिक्स, मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, मिच स्वीपसन, अ‍ॅडम झांपा आणि सीन एबॉट.

भारत: शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), मनीष पांडे, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि टी नटराजन.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif