IND vs AUS 1st ODI: स्टिव्ह स्मिथने झळकावलं करिअरमधील सर्वात जलद शतक, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाविरुद्ध उभारली सर्वाधिक धावसंख्या

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या दमदार शतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात निर्धारित 50 ओव्हरमध्ये 274 धावांचा डोंगर उभारला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्मिथने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत 62 चेंडूत शतकी खेळी केली. स्मिथच्या एकदिवसीय करिअरमधील हे सर्वात वेगवान शतक आहे.

स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: PTI)

IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) आणि स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) यांच्या दमदार शतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात निर्धारित 50 ओव्हरमध्ये 274 धावांचा डोंगर उभारला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्मिथने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत 62 चेंडूत शतकी खेळी केली. स्मिथने केवळ 66 चेंडूंत 105 धावा फटकावत 11 चौकार आणि 4 षटकार ठोकले. आयपीएल 2020 मध्ये स्मिथने सभ्य कामगिरी बजावली आणि 14 सामन्यात 311 धावा केल्या. मात्र, शुक्रवारी आयपीएलनंतरच्या पहिल्या स्पर्धात्मक सामन्यात स्मिथ त्याची उत्कृष्ट कामगिरी ठरली. एकदिवसीय क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियातील हे सर्वात वेगवान शतक आहे. माजी कर्णधाराने केवळ 62 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह शतकी खेळी केली. (IND vs AUS 1st ODI: अ‍ॅडम गिलक्रिस्टने भारतीय गोलंदाजाच्या वडिलांच्या मृत्यूचा दिला चुकीचा संदर्भ, चूक लक्षात येताच मागितली माफी)

आयपीएलचा सामान्य हंगाम झाल्यामुळे स्मिथ निराशा व्यक्त करण्यात मागे राहिला नाही आणि आयपीएलमध्ये तो कधीही चांगली लय गाठू शकला नसल्याचे त्याने कबूल केले. मात्र, भारताविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु असलेल्या सामन्यात स्मिथने आपला गियर बदलला आणि तुफान खेळी केली. स्मिथचं वनडे कारकिर्दीतील दहावे शतक होते. स्मिथच्या एकदिवसीय करिअरमधील हे सर्वात वेगवान, तर ऑस्ट्रिन फलंदाजाने केलेले हे तिसरे जलद शतक आहे. स्मिथ वगळता आजच्या पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार फिंचने एकदविसीय कारकिर्दीतील 17वे शतक झळकावले आणि 114 धावांची खेळी केली, तर डेविड वॉर्नरने 69 धावांची अर्धशतकी खेळी केली. मॅक्सवेलनं भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत 19 चेंडूत झटपट 45 धावा काढल्या. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध वनडे सामन्यात 374/6 धावांची विशाल धावसंख्या उभारली जी एकदिवसीय क्रिकेटमधील भारतविरुद्ध त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध कोणत्याही विरोधी टीमने केलेल्या टीमची ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.

दक्षिण आफ्रिकेने ऑक्टोबर 2015 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्धची सर्वाधिक 438/4 अशी धावसंख्या उभारली होती. त्या सामन्यात विरोधी संघाचे तीन फलंदाज क्विंटन डी कॉक, फाफ डू प्लेसिस आणि एबी डिव्हिलियर्स यांनी शतकी खेळी केली होती. त्यापूर्वी डिसेंबर 2009 मध्ये श्रीलंकेने राजकोट येथे भारताविरुद्धची सर्वाधिक (दुसरी) सर्वोच्च 411/8 धावसंख्या केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now