IND A vs SA A: मॅच दरम्यान मानेवर चेंडू लागल्यावर शिखर धवन काय बोलला, संजू सॅमसन याने केला खुलासा, पहा Post

दक्षिण आफ्रिका एविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन जखमी झाला होता. फलंदाजीच्या वेळी वेगाने येणार चेंडू धवनच्या मानेला लागला. मानेवर बॉल लागल्यानंतर धवन काय बोलला याबाबत भारताचा युवा खेळादय संजू सॅमसनने आता उघड केले आहे. त्याच्या मानेच्या दुखापतीचा एक व्हिडिओ धवनने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

(Photo Credit: shikhardofficial/Twitter)

दक्षिण आफ्रिका ए (South Africa A) विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) जखमी झाला होता. फलंदाजीच्या वेळी वेगाने येणार चेंडू धवनच्या मानेला लागला. पण, असे असताना सुद्धा,  दुखापतीनंतरही त्याने शानदार फलंदाजी केली आणि अर्धशतक ठोकले. सामन्यानंतर शिखरने याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मानेवर बॉल लागल्यानंतर धवन काय बोलला याबाबत भारताचा युवा खेळादय संजू सॅमसन (Sanju Samson) याने आता उघड केले आहे. या सामन्यादरम्यान धवन आणि संजू फलंदाजी करीत होते. तिसरी ओव्हर दक्षिण आफ्रिकेच्या रीझा हेंड्रिक्स (Reeza Hendricks) याने टाकली. ओव्हरचा शेवटचा चेंडू शिखरच्या मानेवर लागला, पण यामुळे तो काही प्रभावित झाला नाही आणि त्याने अर्धशतकाची चमकदार खेळी खेळली. (IND vs PAK, U-19 Asia Cup: अर्जुन-टिळकची शतकी खेळी; भारतीय गोलंदाजांसमोर पाक फलंदाज Fail, पाकिस्तान 60 धावांनी पराभूत)

त्याच्या मानेच्या दुखापतीचा एक व्हिडिओ धवनने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले की,- "आम्ही पडतो, तुटतो होतो, आपण अपयशी होतो... पण नंतर... आपण उठतो, बरे होती आणि त्यावर मात करतो." पण शिखरच्या या व्हिडिओवर कमेंट करताना सॅमसनने त्याच्या मानेवर चेंडू लागल्यानंतर तो काय बोलला ते उघड केले आहे. सॅमसनने सांगितले आहे की, जेव्हा धवनच्या मानेवर चेंडू लागला तेव्हा त्याने मला सांगितले की "चेंडू बघ, तो तुटला असावा..."

 

View this post on Instagram

 

We fall, we break, we fail... But then... WE RISE, WE HEAL, WE OVERCOME.

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

(Photo Credit: shikhardofficial/Twitter)

मॅचबद्दल बोलले तर, विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन आणि सलामीवीर शिखर धवन यांच्या अर्धशतकांसह भारत अ संघाने पाचव्या आणि अखेरच्या अनधिकृत वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिका एला 36 धावांनी पराभूत केले आणि मालिका 4-1 ने जिंकली. सॅमसनने 91 तर शिखरने 51 धावांची

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now