IND-A vs AUS-A 2nd Tour Match: जसप्रीत बुमराहने दुसऱ्या सराव सामन्यात ठोकले प्रथम श्रेणीतील पहिले अर्धशतक, षटकार मारत गाठला टप्पा

ऑस्ट्रेलिया-अविरुद्ध तीन दिवसीय सामन्यात भारताचे युवा आणि दिग्गज फलंदाज स्वस्तात माघारी परतले असताना खालच्या फळीतील जसप्रीत बुमराह संघाच्या बचावासाठी पुढे सरसावला. आपल्या फलंदाजीच्या क्षमतेबद्दल अजिबात ज्ञात नसल्यामुळे बुमराहने जलदगतीने अर्धशतक ठोकले. विल सदरलँडच्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर बुमराहने षटकार खेचला आणि प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले.

जसप्रीत बुमराह टेस्ट (Photo Credit: Twitter/BCCI)

IND-A vs AUS-A 2nd Tour Match: भारत-अ (India-A) आणि ऑस्ट्रेलिया-अ (Australia-A) संघात सध्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) गुलाबी चेंडूने दुसरा सराव सामना खेळला जात आहे. अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्वात करत आहे. तीन दिवसीय सामन्यात रहाणेने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला, पण फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आणि संपूर्ण संघ 194 धावांवर ऑलआऊट झाला. युवा आणि दिग्गज फलंदाज स्वस्तात माघारी परतले असताना खालच्या फळीतील जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघाच्या बचावासाठी पुढे सरसावला. आपल्या फलंदाजीच्या क्षमतेबद्दल अजिबात ज्ञात नसल्यामुळे बुमराहने जलदगतीने अर्धशतक ठोकले आणि भारताला आवश्यक वेळी काही मौल्यवान धावा करण्यास मदत केली. विल सदरलँडच्या (Will Sutherland) ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर बुमराहने षटकार खेचला आणि प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. (IND vs AUS Test 2020: टीम इंडियासाठी खुशखबर! रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास)

भारतीय संघ 194 धावांवर ऑलआऊट झाला तर बुमराह फक्त 57 चेंडूत 55 धावांवर नाबाद परतला. बर्‍याच वर्षांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध ग्लेन मॅकग्राच्या अर्धशतकाशी बुमराहच्या कामगिरीची तुलना केली. बुमराहने आपल्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकत टीम इंडियाचा डाव हाताळला आणि संघाला सन्माननीय धावसंख्या मिळवून दिली. पहिले फलंदाजी करताना भारतासाठी मयंक अग्रवालने 2 धावा केल्या, तर पृथ्वी शॉ 40, शुभमन गिलने 43 तर हनुमा विहारीने 15 धावा केल्या. मोहम्मद सिराजने 22 धावा केल्या. बुमराह आणि सिराजमध्ये 10व्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी झाली. पहिल्या सराव सामन्यात शतकी खेळी करणारा कर्णधार रहाणे पहिल्या डावात 4 धावाच करू शकला तर अन्य फलंदाज दुहेरी धावसंख्या पार करू शकले नाही.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासाठी सीन एबॉट आणि जॅक वाइल्डर्मथ यांना प्रत्येकी 3 विकेट मिळाल्या. विशेष म्हणजे सराव सामन्यात कर्णधार विराट कोहली व्यतिरिक्त केएल राहुल, आर अश्विन, कुलदीप यादव आणि उमेश यादव यांना विश्रांती देण्याचा निर्णय टीम इंडियाने घेतला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 17 डिसेंबरपासून खेळला जाणार आहे.