PSL 2020 पूर्वी इमाद वसीम ने केला धक्कादायक खुलासा, तीन गोलंदाजांवर लगावला बॉल टॅम्परिंगचा आरोप

या गोलंदाजांमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाज, सोहेल खान आणि इंग्लंडचा रवी बोपारा यांचा समावेश आहे.

इमाद वसीम (Photo Credits: Getty Images)

पाकिस्तान (Pakistan) राष्ट्रीय क्रिकेट संघाचा सदस्य आणि पाकिस्तान सुपर लीग (PSL) फ्रॅंचायझी कराची किंग्जचा कर्णधार इमाद वसीम (Imad Wasim) याने तीन गोलंदाजांवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. या गोलंदाजांमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाज, सोहेल खान आणि इंग्लंडचा रवी बोपारा यांचा समावेश आहे. पीएसएलच्या सर्व कर्णधारांच्या बैठकीत इमाडने हा खुलासा केला. ‘रोजनामा पाकिस्तान’ च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. पीएसएलचे मॅच रेफरी रोशन महानामा यांच्यासमवेत पीएसएलच्या सर्व संघांच्या कर्णधारांच्या बैठकीत इमादने हा धक्कादायक खुलासा केल्याचे सांगण्यात आले. या बैठकीदरम्यान महानामा म्हणाले की, कोणत्याही खेळाडूने बॉल टॅम्परिंग (Ball-Tampering) न करावी याची खात्री केली पाहिजे. यंदा पीएसएलमध्ये याप्रकरणी कडक कारवाई केली जाईल. यावर इमाद वसीम म्हणाले की, बरेच गोलंदाज चेंडू खराब करतात आणि ते कळत नाही.

महानमाने त्याला विचारले की हे करणारे कोण आहेत? पण, इमादने यावर प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, पेशावर झल्मीचा कर्णधार दर्यान डॅरेन सॅमी आपले म्हणणे पुढे केले. पण महानमांनी पुन्हा एकदा इमादला उद्देशून म्हटले की, 'तूला माहित असेल तर मग बॉल टॅम्परिंग करणारे खेळाडू कोण आहेत हे सांगायला हवे'. यावर वहाब, बोपारा आणि सोहेल खान यांची नावे इमादने घेतली. सोहेल आणि बोपारा हे कराची किंग्जकडून खेळले आहेत. "मी बैठकीत असेही सुचवले की कोणताही संघ किंवा खेळाडू असे करताना पकडले गेले तर त्यांच्या कर्णधारावर या गुन्ह्याबद्दल बंदी घालावी," वसीम म्हणाका.

क्रिकेटच्या कोणत्याही स्तरावरील स्पॉट फिक्सिंग आणि बॉल-टेंपरिंगच्या गुन्ह्यांना किती गंभीरपणे घेतले गेले आहे याबद्दल महानामा संघाचे अधिकारी आणि कप्तानांना स्पष्टपणे स्पष्ट केले. पीएसएलमध्ये बॉल टेंपरिंगच्या घटना रोखणे कठीण होईल, अशी टीका वसीमने बैठकीत केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif