भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर ने केले एमएस धोनीचे समर्थन, म्हणाला फिट असल्यास टीम इंडियामध्ये समावेश होणे आवश्यक
धोनीने संघात पुनरागमन करावे अशी त्याची इच्छा आहे. जाफर म्हणाला की, स्टम्पच्या मागे असलेल्या धोनी राहुलकडून दबाव काढून घेऊ शकतो.
भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सहवागने महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) भारतीय संघात (Indian Team) पुनरागमन करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की तो संघात कुठे फिट बसेल? रिषभ पंत आणि केएल राहुल यांनी चांगली कामगिरी करत त्याची कमी पूर्ण केली असल्याचं सहवाग म्हणाला. धोनीला भारतीय संघात पुनरागमन करणे अवघड असल्याचाजरी सेहवागचा असा विश्वास आहे परंतु याच्याशी माजी फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer) त्याच्याशी सहमत नसल्याचे दिसते आणि धोनीने संघात पुनरागमन करावे अशी त्याची इच्छा आहे. जाफर यांनी बुधवारी सांगितले की, भारताला तंदुरुस्त धोनीच्या पलीकडे पाहणे परवडणार नाही. नुकत्याच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या जाफरला असे वाटते की माजी भारतीय कर्णधार (धोनी) ही संघासाठी एक प्रमुख खेळाडू आहे. जाफर म्हणाला की, स्टम्पच्या मागे असलेल्या धोनी राहुलकडून दबाव काढून घेऊ शकतो. (IPL 2020: एमएस धोनीचं टीम इंडियात कमबॅक आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून, टी-20 लीग यावर्षी रद्द झाल्यास काय होईल, घ्या जाणून)
"जर धोनी तंदुरुस्त असेल आणि फॉर्मात असेल तर आम्ही त्याला संघातून बाहेर ठेवू शकतो असे मला वाटत नाही. विकेटच्या मागे तो खूप महत्वाची भूमिका निभावतो आणि शेवटी फलंदाजीदेखील करू शकतो. धोनीच्या आगमनाने केएल राहुलच्या खांद्यावरुन विकेटकीपिंगचा दबाव काढून घेईल आणि डाव्या हाताच्या फलंदाजांची गरज भासल्यास भारत पंतला फलंदाज म्हणून खेळवू शकेल," असं वासिमने ट्विट करून आपले मत व्यक्त केले.
दरम्यान, 38 वर्षीय धोनी खेळापासून काही काळ दूर राहात आहे. त्याने अखेरची स्पर्धा 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळली होती. शिवाय धोनीला बीसीसीआयच्या मध्यवर्ती करारातील खेळाडूंच्या यादीमध्येही स्थान मिळाले नाही. बीसीसीआयने ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीतील खेळाडूंच्या केंद्रीय कराराची यादी जाहीर केली होती. दुसरीकडे,7 मार्च रोजी जाफरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने 31 कसोटींमध्ये त्याने 34.11 च्या सरासरीने 19 44 धावा केल्या आहेत. यात 5 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. वेस्ट इंडिजमध्ये दुहेरी शतक ठोकणार्या काही भारतीय फलंदाजांपैकी तो एक आहे. त्याने सेंट लुसियामध्ये यजमानांविरुद्ध 212 धावा केल्या.