IND vs AFG T20 WC 2024 Super 8 Live Streaming Online: भारतासमोर अफगाणिस्तानचे आव्हान, सुपर 8 सामना मोफत पाहायचा असेल तर करावे लागेल हे काम
भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यावर पावसाचे सावट असले तरी सामना सुरळीत पार पडला तर इतिहास भारताच्या बाजूने जाईल असे दिसते.
IND vs AFG T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषकात सुपर-8 चे सामने सुरु झाले आहेत, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने पहिले सामने जिंकले आहेत. आता भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) 20 जूनला आमनेसामने येणार आहेत. भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यावर पावसाचे सावट असले तरी सामना सुरळीत पार पडला तर इतिहास भारताच्या बाजूने जाईल असे दिसते. आम्ही तुम्हाला सांगतो की भारत एकही सामना न गमावता सुपर-8 मध्ये आला आहे, तर अफगाणिस्तानचा एकमेव पराभव वेस्ट इंडिजविरुद्ध झाला आहे. दरम्यान, या सामन्याचा आनंद घेण्यासाठी चाहत्यांना कुठे सामना पाहावा लागणार आहे या लेखाद्वारे आपण जाणून घेवूया..
कधी अन् कुठे होणार सामना?
भारत आणि अफगाणिस्तान यामधील सुपर-8 सामना बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे. चाहत्यांना हा सामना 20 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे.
टीव्हीवर सामना कुठे प्रसारित केला जाईल?
भारतात, टी-20 विश्वचषक 2024 सुपर-8 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणारा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल. (हे देखील वाचा: Team India T20I Record In Kensington Oval: सुपर-8 मध्ये IND vs AFG आमनेसामने, बार्बाडोसमध्ये कसा आहे भारताचा रेकॉर्ड; एका क्लिकवर पाहा आकडेवारी)
मोबाईलवर 'फ्री' लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायला मिळणार?
डिस्ने प्लस हॉटस्टारवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'फ्री' असेल. तथापि, केवळ मोबाइल वापरकर्ते विनामूल्य लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतील.
टी-20 विश्वचषकासाठी दोन्ही संघांचे खेळाडू
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल, कुलदीप यादव, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल
अफगाणिस्तान संघ: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झदरन, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, मोहम्मद इशाक, नांगेलिया खरोटे, हजरतुल्ला झाझई