India Tour Of Australia 2020: टिम पेन ने गब्बामध्ये टेस्ट खेळल्याचे विराट कोहली ला दिले आव्हान, पाहा व्हिडिओ

पेनला एका पत्रकार परिषदेत विचारले की, भारताविरुद्ध पुढील वर्षी मालिकादेखील गाब्बा येथे सुरू व्हायला आवडेल का? यावर पेनने चांगल्या पद्धतीने उत्तर देत विराटला पुढील वर्षी मालिकेची सुरुवात गब्बामधून करण्याचे आव्हान केले.

टिम पेन, विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

भारताने (India) बांग्लादेशला पहिल्या गुलाबी बॉल टेस्टमध्ये डाव आणि 46 धावांनी पराभूत केले. या संघाच्या विजयात विराट कोहली (Virat Kohli) याच्या शतकाव्यतिरिक्त वेगवान गोलंदाजांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यांनी या कसोटीत एकूण 19 विकेट घेतल्या. या विजयानंतर भारतीय कर्णधार विराटने संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. भारतीय संघाचा हा पहिला डे-नाईट सामना होता. आणि आता पुढील वर्षी भारतीय संघ हिवाळ्यात ऑस्ट्रेलियाच्या (Australia) दौऱ्यावर जाणार आहे. आणि इथे ते पिंक बॉल टेस्ट खेळेल अशी आशा ऑस्सी कर्णधार टिम पेन (Tim Paine) याने व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाने 1988 पासून गाब्बा क्रिकेट स्टेडियममध्ये मालिका विजयाचे सत्र सुरु ठेवले आहे आणि पेनने ही बाद कोहलीच्या लक्षात आणून दिली. ऑस्ट्रेलियाने आज पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध गब्बामध्ये (Gabba) डाव आणि 5 धावांनी विजय मिळवला. (AUS vs PAK 1st Test: यासीर शाह याने स्टीव्ह स्मिथ याला टेस्टमध्ये 7 व्यांदा वेळेस केले बाद, असा इशारा करत सेलिब्रेट केली विकेट, पाहा व्हिडिओ)

ब्रिस्बेनचे मैदानात ऑस्ट्रेलियामधील घरगुती कसोटी मालिका सुरु करण्याची फार पूर्वीपासूनची परंपरा आहे, परंतु मागील वर्षी भारत विरुद्ध चार सामन्यांच्या मालिकेसाठी ते सोडण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाने रविवारी गाब्बा येथे पाकिस्तानवर डाव आणि पाच धावांनी विजय मिळवून 2019-20 चा कसोटी मालिकेची सुरुवात केली. या विजयानंतर पेनला एका पत्रकार परिषदेत विचारले की, भारताविरुद्ध पुढील वर्षी मालिकादेखील गाब्बा येथे सुरू व्हायला आवडेल का? यावर पेनने चांगल्या पद्धतीने उत्तर देत विराटला पुढील वर्षी मालिकेची सुरुवात गब्बामधून करण्याचे आव्हान केले. पेन म्हणाला की, “होय, आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. त्यासाठी आम्हाला विराटच्या मागे लागावे लागणार आहे, आम्हाला त्याच्याकडून नक्कीच एखाद्या टप्प्यावर उत्तर मिळेल. आम्हाला येथून उन्हाळ्याची सुरुवात करायला आवडते आणि हे फक्त शेवटच्या उन्हाळ्यामध्येच झाले नव्हते.” बांग्लादेशविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या पहिल्या डे-नाईट टेस्ट सामन्यात विराटने 136 धावांची प्रभावी खेळी केली.

दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा दुसरा सामना अ‍ॅडिलेडच्या मैदानावर खेळला जाईल. त्याच्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध पर्थ, मेलबर्न आणि सिडनी मैदानावर तीन कसोटी सामन्यांच्या मालिका सुरु होईल.



संबंधित बातम्या