ICC WTC Final 2021 Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेता संघ होणार मालामाल, मिळणार तब्बल इतक्या कोटींची बक्षिस रक्कम

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अलार्डिस यांनी जाहीर केले आहे की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्यास बक्षीस रक्कम म्हणून 1.6 लाख अमेरिकन डॉलर्स देण्यात येणार येतील भारतीय चलनात ही रक्कम 11.72 कोटी इतकी आहे.

केन विल्यमसन-विराट कोहली व आयसीसी चॅम्पियनशिप गदा (Photo Credit: Twitter)

ICC WTC Final 2021 Winners Prize Money: आयसीसीच्या (ICC) मुख्य कार्यकारिणीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship Final) विजेत्या संघाला दिली जाणारी बक्षिसाची रक्कम जाहीर केली. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अलार्डिस (Geoff Allardice) यांनी जाहीर केले आहे की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्यास बक्षीस रक्कम (World Test Championship Prize Money) म्हणून 1.6 लाख अमेरिकन डॉलर्स देण्यात येणार येतील भारतीय चलनात ही रक्कम 11.72 कोटी इतकी आहे तर उपविजेत्याला $800,000 (5.85 कोटी) दिले जातील, ESPNCricinfo ने ट्विट केले. तसेच, सामना बरोबरीत राहिल्या रक्कम दोन्ही संघात बरोबरीत (8.78 कोटी) वाटली जाईल. शिवाय, विजेता संघ कसोटी चॅम्पियनशिपची गदा देखील घरी घेऊन जाईल. विराट कोहली न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध 18 जूनपासून साऊथॅम्प्टनच्या (Southampton) एजस बाउल येथे न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) पहिल्या अंतिम सामन्यात भारताचे (India) नेतृत्व करेल. (ICC ने सुरु केला भारत विरुद्ध न्यूझीलंड WTC फायनल सामन्याचे काऊंटडाऊन, आता शिल्लक फक्त इतके दिवस)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे अंतिम सामना होणार आहे. विराट कोहली आणि केन विल्यमसन दोघांनीही आतापर्यंत कर्णधार म्हणून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत दोघेही विजेतेपदासाठी सर्वतोपरीने प्रयत्नशील असतील. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी 23 जून हा राखीव दिवस ठेवला आहे. पाच दिवस पूर्ण सामना पूर्ण न झालया त्याचा वापर केला जाईल. परंतु, यावर मॅच रेफरी अंतिम निर्णय घेतील. भारतीय क्रिकेट संघ 3 जून रोजी साऊथॅम्प्टनमध्ये दाखल झाला होता आणि त्यानंतर, दौऱ्यावरील प्रत्येक खेळाडूने तीन दिवसाचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. हॅम्पशायर बाउलमध्ये, व्यवस्थापित आयसोलेशन कालावधी पूर्ण केल्यावर खेळाडूंची पुन्हा चाचणी घेण्यात आली.

दुसरीकडे, न्यूझीलंड- सध्याचा आयसीसी कसोटी क्रमवारीत जागतिक क्रमवारीतील नंबर- 1 संघ, यजमान इंग्लंड विरोधात मालिका जिंकल्यानंतर भारताला कडवी झुंज देणे अपेक्षा आहे. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये किवी संघ जो रूटच्या नेतृत्वातील संघावर वरचढ राहिला. 2019 मध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची सुरुवात झाली होती. पॉईंट टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल तर न्यूझीलंड संघाने दुसऱ्या स्थानावर राहील अजिंक्यपदाच्या निर्णायक सामन्यात प्रवेश केला होता. 2023 ते 2031 दरम्यान आयसीसी आणखी चार हंगाम आयोजित करेल.