ICC World Cup 2019: वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालामाल, टूर्नामेंटच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम- 40 लाख डॉलर्स मिळणार

यंदा वर्ल्ड कपचे सामने इंग्लड (England) येथे खेळवले जाणार आहेत.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Twitter)

ICC World Cup 2019: आईसीसी वर्ल्ड कप 2019 येत्या 30 मे पासून सुरु होणार आहे. यंदा वर्ल्ड कपचे सामने इंग्लड (England) येथे खेळवले जाणार आहेत. जगभरातील दहा संघ वर्ल्ड कपच्या संघासाठी एकमेकांशी क्रिकेटच्या मैदानावर उत्तम खेळी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

तसेच वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामन्याच्या विजेत्या संघाला ट्रॉफीसह मानधन सुद्धा दिले जाणार आहे. आईसीसीने दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कपसाठी एकूण 1 करोड डॉलर्स (70.12 करोड) रुपये विजेता संघांसाठी देण्यात येणार आहे. तर सेमीफायनल मध्ये पराभव होणाऱ्या संघाला 8 लाख डॉलर्स (5.60 करोड) रुपये मिळणार आहे.

मात्र वर्ल्ड कप विजेत्या संघाला तब्बल 40 लाख डॉलर्स (28 करोड) रुपये मिळणार आहेत. ही रक्कम टूर्नामेंटच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम असल्याचे म्हटले जात आहे.(ICC World Cup 2019 Time Table: 30 मे पासून सुरू होणार क्रिकेटच्या विश्वविजेते पदाची चुरस; PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 चं संपूर्ण वेळापत्रक)

आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सामन्यातील विजयी संघासाठी मिळणारी रक्कम-

>विजेता संघ- 40 लाख डॉलर्स (28 करोड)

>उपविजेता संघ- 20 लाख डॉलर्स (14 करोड)

>सेमीफायनलमध्ये पराभव झालेला संघ- 8-8 लाख डॉलर्स (5.60 करोड)

> सामना विजेता संघ- 40000 डॉलर्स (28 लाख रुपये)

>लीगमधून पुढे जाणारा संघ- 1 लाख डॉलर्स (70 लाख)

वर्ल्ड कपचा अंतिम सामना 14 जुलै रोजी लॉडर्स येथे खेळवला जाणार आहे. तर सेमीफायनलचा सामना मॅनचेस्टर मधील ओल्ड ट्रॅफर्ड आणि बर्मिघम मधील एजबेस्टन मैदानावर क्रमश: 9 आणि 11 जुलै रोजी होणार आहे.