ICC World Cup 2019: कोणता संघ यंदा वर्ल्ड कप मध्ये 500 धावा काढू शकतो, दिग्गज खेळाडूंनी असा लावला अंदाज
तर गेल्या काही एकदिवशीय क्रिकेटच्या सामन्यात विविध संघांनी 300 चा आकडा पार केला आहे.
ICC World Cup 2019: आईसीसी वर्ल्ड कप येत्या 30 मे पासून इंग्लंड येथे सुरु होणार आहे. तर गेल्या काही एकदिवशीय क्रिकेटच्या सामन्यात विविध संघांनी 300 चा आकडा पार केला आहे. त्यामुळेच यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये कोणता संघ 500 धावांचा आकडा पार करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यासाठी विविध संघातील दिग्गज खेळाडूंनीसुद्धा 500 चा आकडा कोणता संघ पार करणार आहे याचा अंदाज लावला आहे.
तर भारतीय संघाचा कर्णधार याच्या मतानुसार 500 धावा काढणारा संघ म्हणजे इंग्लंड ठरेल असा त्याचा अंदाज आहे. कारण गेल्या वेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडच्या संघाने 6 विकेट्स देत 481 धावा काढल्या होत्या. त्याचसोबत ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार फिंच याने असे म्हटले की, काही वर्षांत तुम्ही बघितले असल्यास इंग्लंडचा स्कोर सर्वात वरच्या दिशेला दिसून येत आहे.(ICC Cricket World Cup 2019: 'टीम इंडिया'चे कोच रवी शास्त्री यांनी विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांच्यातील नात्याबद्दल केला मोठा खुलासा)
विराट कोहलीच्या संघाबद्दल बोलायचे झाल्यास 50 ओव्हरचा सामना असल्यामुळे 270 किंवा 380 धावांचा पाठलाग करणे खुप मुश्किल असल्याचे विराटचे म्हणणे आहे. परंतु वर्ल्ड कपच्या सुरुवातील संघाला सतर्क राहावे असे आवाहन कोहलीकडून देण्यात येणार आहे.