ICC World Cup 2019: IND vs SL मॅचमध्ये टीम इंडिया साठी चिअर करताना दिसली 'सुपर फॅन' चारुलता पटेल, पहा (Photos)
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान प्रसिद्ध झालेली टीम इंडिया ची सुपर फॅन, चारुलता पटेलआज्जी पुन्हा एकदा संघाला समर्थन देताना लीड्सच्या मैदानात दिसली.
आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वकप 2019मध्ये आज भारत (India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) सामना इंग्लंड (England) मध्ये सुरु आहे. ही मॅच लीड्स (Leeds), हेडिंग्ले (Headingley) क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळली जात आहे. हा सामना जिंकताच भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचू शकतो. दरम्यान, भारत विरुद्ध बांगलादेश (Bangladesh) सामन्यादरम्यान प्रसिद्ध झालेली टीम इंडिया ची सुपर फॅन, चारुलता पटेल (Charulata Patel) आज्जी पुन्हा एकदा संघाला समर्थन देताना लीड्सच्या मैदानात दिसली. (IND vs SL सामन्यात हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांच्या असमन्वयामुळे Netizens संतापले, म्हणाले 'गली क्रिकेट खेलताहात का')
भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने चारुलता आज्जींना आपल्या कोट्यातील चार तिकिटे दिली आहेत. शिवाय कोहली म्हणाला की जर टीम इंडिया विश्वकपच्या फायनलमध्ये पोहचते तर तो त्यांना त्या सामन्याचे तिकीट देखील देईल.
बांग्लादेशविरुद्ध सामन्यात या आज्जींनी सर्वांची मने जिंकली. भारताच्या खेळाडूंनाही यांना भेटायचा मोह आवरता आला नाही. विराट आणि या लढतीतील सामनावीर रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी या आज्जीबाईंची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले.