IPL Auction 2025 Live

ICC World Cup 2019: रिषभ पंत याच्या बाबत ही गोष्ट आहे टीम इंडियासाठी चिंतेची बाब

टीम इंडियाचा फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी कबूल केले की क्षेत्ररक्षणात मधल्या फळीतील फलंदाज यंग रिषभ पंतला अजूनही सुधारणा करायची गरज आहे.

(Photo by Robert Cianflone/Getty Images)

कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी (ICC) विश्वकपच्या सेमीफाइनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडिया चे सर्व खेळाडू तुफानी फॉर्म मध्ये आहे आणि आपल्या खेळीने कमल करत आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), मोहम्मद शमी (Mohammed Shami), विराट, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सारखे खेळाडू आपली छाप सोडण्यात यशस्वी झाले आहेत. दरम्यान, सर्वांचे लक्ष आहे ते मधल्या फळीतील फलंदाज यंग रिषभ पंत (Rishabh Pant) वर. आपला पहिला विश्वकप खेळात असलेला पंत पहिल्या सामन्यात काही करू शकला नाही मात्र, बांगलादेश विरुद्ध त्याने 48 धावा केल्या. शिवाय त्याने एम एस धोनी सह महत्वाची भागीदारी करत संघाला मोठा स्कोर करण्यात मदत केली. पण, पंतबाबत एक गोष्ट आहे जी टीमसाठी चिंतेची बाब आहे.  (CWC 2019 IND vs BAN: संजय मांजरेकर यांच्या वादग्रस्त कॉमेंट्रीवर रवींद्र जडेजा याचा पलटवार, नेटकऱ्यांनी मिम्स मधून दिला पूर्ण पाठिंबा)

टीम इंडियाचा फिल्डिंग कोच आर श्रीधर ( R Sridhar) यांनी कबूल केले की क्षेत्ररक्षणात पंतला अजूनही सुधारणा करायची गरज आहे. "पंतवर अजून भरपूर काम करायचे आहे. सर्वप्रथम म्हणजे त्याला फेकण्याच्या प्रक्रिया सुधारण्याची गरज आहे आणि आउटफील्डर होण्यासाठी थोडासा ऍथलेटिक होण्याची आवश्यकता आहे."

"आम्हाला पंतला योग्य (फील्डिंग) पोजीशनमध्ये वापरणे आवश्यक आहे, जे विराट आणि धोनी (Dhoni) करण्यास उत्सुक आहेत. योग्य वेळी त्याला योग्य ठिकाणी ठेवा. इंग्लंड विरुद्ध सामन्यात त्याने किमान पाच धावा वाचवल्या जो एक प्रचंड बोनस होता. त्याने की झेल सुद्धा घेतला."

दरम्यान, बांगलादेशविरुद्ध सामन्यात भारताने एकावेळी तीन विकेटकीपर (धोनी, दिनेश कार्तिक, पंत) यांना खेळवले होते. विश्वकपमधील भारताचा पुढील सामना श्रीलंका (Sri Lanka) शी 6 जुलै ला हेडिंग्ले (Headingley) येथे खेळाला जाईल.