ICC World Cup 2019: वेस्ट इंडिज मॅचमध्ये भारताच्या विजयाने सेमीफायनलची समीकरणे बदलली, पाकिस्तान खुश; जाणून घ्या काय आहे स्थती
भारताच्या या विजयाने पाकिस्तान ला फायदा झाला आहे कारण कॅरिबियन संघाचे विश्वकप मधील आव्हान संपुष्टात आले आहे.
मॅन्चेस्टर (Manchester) मध्ये झालेल्या भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) सामन्यात टीम इंडिया ने दणदणीत विजय मिळवत विश्वकप च्या सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. पहिले फलंदाजी करत भारताने 269 धावांपर्यंत मजल मारली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ फक्त 143 धावा करू शकला. या विजयासह टीम इंडिया विश्वकप मध्ये एकमेव अपारजित संघ आहे. विराट कोहली (Virat Kohli) च्या सेनेने 6 पैकी 5 मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघ सध्या 11 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. (IND vs WI, ICC World Cup 2019: मोहम्मद शमी ने केले शेल्डन कॉटरेल च्या मिलिट्री स्टाइल सैल्यूट चे अनुकरण; विराट, चहल ला हसू अनावर झाले Video)
मात्र, भारताच्या या विजयाने सेमीफाइनलची समीकरनेच बदलून टाकली आहेत. भारताच्या या विजयाने पाकिस्तान (Pakistan) ला फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांना पराभूत करत पाक ने विश्वकपमध्ये कमबॅक केले आहे. 7 गुणांसह सध्या पाकचा संघ गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे. सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताला केवळ एका विजयाची गरज आहे तर पाकिस्तानला भारतावर अवलंबून रहावे लागणार आहे. भारतानं सर्व सामने जिंकल्यास पाकिस्तान सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो.
दरम्यान, सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इंग्लंड (England) आणि बांगलादेश (Bangladesh) चा संघ ही प्रयत्नांत आहे. इंग्लंड चे सेमीफायनलमधील स्थान धोकादायक आहे. इंग्लंडचे दोन सामने बाकी आहेत, हे दोन्ही सामने न्यूझीलंड आणि भारत यांच्याविरोधात होणार आहेत. त्यामुळे यजमान संघाच्या समस्या वाढल्या आहेत. दुसरीकडे, बांगलादेश चे दोन सामने बाकी आहे त्यातील पहिला भारत तर दुसरा पाकिस्तानशी आहे. जर बांगलादेश दोन पैकी एक सामना हरला आणि पाकिस्तान आपले दोन्ही सामने जिंकला तर तो सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो.