ICC World Cup 2019 Opening Ceremony: जाणून घ्या कुठे आणि कधी बघाल वर्ल्डकपचा उद्धाटन सोहळा

इंग्लड (England) वेल्स येथे हा सोहळा पार पडणार असून या स्पर्धेत जगभरातील 10 क्रिकेटचे संघ सहभागी होणार आहेत.

ICC World Cup 2019 (Photo Credits-Twitter)

ICC World Cup 2019 Opening Ceremony: आईसीसी वर्ल्ड कप 2019 चे क्रिकेट सामने सुरु होण्यापूर्वी आज (29 मे) शानदार उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. इंग्लड  (England) वेल्स येथे हा सोहळा पार पडणार असून या स्पर्धेत जगभरातील 10 क्रिकेटचे संघ सहभागी होणार आहेत. तर उद्यापासून क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.

या सोहळ्यासाठी जवळजवळ 4 हजारपेक्षा अधिक क्रिकेटचे चाहते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच इंग्लंडमधील शाही घराणे आणि महाराणी सुद्धा वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीला उपस्थिती लावणार आहे. तर जाणून घ्या कुठे आणि कधी बघाल वर्ल्ड कपचा उद्घाटन सोहळा.

वर्ल्ड कप 2019 चा उद्घाटन सोहळा लंडन मधील एका प्रतिष्ठित मॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तसेच भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता हा उद्घटन सोहळा पाहायला मिळणार आहे. या सोहळ्याचे लाइव्ह टेलिकास्ट तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनल्सवर पाहू शकता. त्याचसोबत हिंदी कॉमेंट्रिमधून पाहण्याठी तुम्ही स्टार स्पोर्ट्स हिंदी येथे हा सोहळा पाहता येणार आहे.

(ICC Cricket World Cup 2019: यावर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत लागू झाले 7 नवे नियम; खेळाडूंंच्या अडचणी वाढल्या)

वर्ल्ड कप संघाचा पहिला सामना उद्या (30 मे) इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघासोबत खेळवला जाणार आहे. तर भारतीय संघाचा 5 जून रोजी दक्षिण आफ्रिका सोबत सामना रंगणार आहे.



संबंधित बातम्या