ICC Women's World Cup 2022 Points Table: बांगलादेशवर मोठ्या विजयामुळे टीम इंडियाला फायदा, नंबर 1 सिंहासनावर ऑस्ट्रेलियाचा ताबा; पहा ताजे पॉईंट टेबल

बांगलादेश महिलांविरुद्ध टीम इंडियाला पॉईंट टेबलमधेही चांगला फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या सलग सहाव्या विजयासह पॉईंट टेबलच्या नंबर एक क्रमांकावर आपला ताबा मजबूत केला आहे.

भारत महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

ICC Women's World Cup 2022 Points Table: आयसीसी महिला विश्वचषक (Women's World Cup) मधील आपल्या ‘करो या मरो’ सामन्यात मिताली राज (Mithali Raj) हिच्या भारतीय संघाने (Indian Team) बांगलादेश महिलांना (Bangladesh Women) एकतर्फी सामन्यात पराभूत करून स्पर्धेत आपल्या सेमीफायनल खेळण्याच्या अशा पल्लवित ठेवल्या आहेत. भारतासाठी बांगलादेशविरुद्ध सामन्यात विजय आवश्यक होता. आणि भारतीय संघाने तो विजय मोठ्या अभिमानाने मिळवला. मिताली राज अँड कंपनीने बांगलादेशला मोठ्या पराभवाची चव चाखवली. या स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 6 सामन्यांमधला भारताचा हा तिसरा विजय आहे. त्याचवेळी बांगलादेशने 5 सामन्यांमध्ये चौथा पराभव पत्करला. बांगलादेश महिलांविरुद्ध टीम इंडियाला (Team India) पॉईंट टेबलमधेही चांगला फायदा झाला आहे. भारताने बांगलादेशपुढे 230 धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण प्रत्युत्तरात संघ अवघ्या 119 धावांवर ढेर झाला. (IND W vs BAN W, World Cup 2022: भारताचा बांगलादेश महिलांवर सनसनाटी विजय; Yastika Bhatia पाठोपाठ गोलंदाजांची चमकदार कामगिरी)

आयसीसी महिला विश्वचषकात आज, 22 मार्च रोजी दोन सामने खेळले गेले. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहे. यामध्ये कांगारू संघाने कर्णधार मेग लॅनिंग हिच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर विजय दमदार विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशला धूळ चारली. यासह आता विश्वचषक गुणतालिकेत मोठे बदल झाले आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या सलग सहाव्या विजयासह पॉईंट टेबलच्या नंबर एक क्रमांकावर आपला ताबा मजबूत केला आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकात पहिल्या पराभवाची चव चाखली पण ऑस्ट्रेलियाप्रमाणे उपांत्य फेरीतही प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेने 5 सामन्यात 4 जिंकले आहेत. तर बांगलादेशावरील मोठ्या विजयासह भारताने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

उल्लेखनीय आहे की, टीम इंडिया प्रमाणेच वेस्ट इंडिजने देखील 6 पैकी 3 सामने जिंकले असून दोंघांना सेमीफायनलसाठी पात्र ठरण्याची चांगली संधी आहे. भारताचा आता शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. तथापि भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा नेट रन-रेट ऑस्ट्रेलियानंतर सर्व संघांमध्‍ये सर्वोत्तम आहे.  अशा परिस्थितीत आता साखळी फेरीतील अंतिम सामन्यातील विजय भारताला थेट सेमीफायनलचे तिकीट मिळवून देईल. तसेच गतविजेता इंग्लंडने आपले शिल्लक दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले तर त्यांनाही सेमीफायनल गाठण्याची संधी आहे. याशिवाय यजमान न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर पडला आहे.