ICC Women’s T20 World Cup: ऑस्ट्रेलिया संघाचा फायनलमध्ये प्रवेश, दक्षिण आफ्रिकेला केले 5 धावांनी पराभूत; भारताशी होणार अंतिम सामना
आता फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होणार आहे.
आयसीसी महिला टी -20 विश्वचषक 2020 (ICC Women’s T20 World Cup) चा दुसरा उपांत्य सामना, आज सिडनी क्रिकेट मैदानावर यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात रंगला. या रोमांचकारी सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेला 5 धावांनी पराभूत करून फायनलमध्ये जागा मिळवली. आता फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला 135 धावांचे लक्ष्य दिले. मात्र, पावसामुळे त्यात बदल करण्यात आला.
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 13 षटकांत 98 धावा करायच्या होत्या. परंतु प्रोटीयाजने 13 षटकांत 5 बाद 92 धावा केल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार डेन व्हॅन निकर्कने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कांगारू संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 134 धावा केल्या. यजमान ऑस्ट्रेलिया संघाकडून मेग लेनिंगने सर्वाधिक 49 धावा केल्या. त्याचवेळी बेथ मूनी 28 धावांवर बाद झाला. नदीन डिक्लार्कने 3 गडी बाद केले.
यापूर्वी सिडनी क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला उपांत्य सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे पॉइंट टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर असलेला भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला. अंतिम सामन्यात कांगारूंची टीम आता टीम इंडियाशी भिडणार आहे. आजच्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघाने गुणांच्या आधारे, इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना जिंकला. या स्पर्धेत टीम इंडियाने प्रथमच अंतिम फेरी गाठली आणि आता जेतेपदापासून त्यांचा फक्त एक विजय दूर आहे. टूर्नामेंटचा अंतिम सामना 8 मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर रंगणार आहेत.