ICC Women's T20 World Cup 2024 मध्ये टीम इंडियाचे सराव सामने आजपासून, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार विनामूल्य सामना

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, सर्व संघांना एक सराव सामना खेळायचा आहे, ज्यामध्ये हे संघ त्यांच्या तयारीला अंतिम रूप देतील. पहिला सराव सामना आज पाकिस्तान आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे, तर टीम इंडियाही उद्यापासून आपले दोन सराव सामने खेळणार आहे.

ICC Women's T20 World Cup Trophy (Photo Credit - X)

ICC Women's T20 World Cup 2024: आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 (ICC Women's T20 World Cup 2024) 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यावेळी ही स्पर्धा यूएईच्या (UAE) यजमानपदाखाली खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी टीम इंडियासह (Team India) सर्व 10 संघ यूएईला पोहोचले आहेत. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, सर्व संघांना एक सराव सामना खेळायचा आहे, ज्यामध्ये हे संघ त्यांच्या तयारीला अंतिम रूप देतील. पहिला सराव सामना आज पाकिस्तान आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे, तर टीम इंडियाही उद्यापासून आपले दोन सराव सामने खेळणार आहे.

टीम इंडिया वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार 

आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 च्या मोहिमेपूर्वी टीम इंडिया वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचा सराव सामना 29 सप्टेंबरला, तर दुसरा सराव सामना 1 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. हे दोन्ही सामने दुबई स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवले जातील. (हे देखील वाचा: Women's T20 World Cup 2024 Prize Money: आयसीसीचा मोठा निर्णय! आता महिलांनाही टी-20 विश्वचषक विजेता पुरुषांइतकीच मिळणार बक्षीस रक्कम)

सराव सामन्याचे वेळापत्रक

28  सप्टेंबर  पाकिस्तान विरुद्ध स्कॉटलंड  दुबई

28  सप्टेंबर  श्रीलंका विरुद्ध बांगलादेश  दुबई

29  सप्टेंबर  ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड  दुबई

29  सप्टेंबर  भारत विरुद्ध वेस्ट इंडिज  दुबई

29  सप्टेंबर  न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका  दुबई

30  सप्टेंबर  पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश  दुबई

30  सप्टेंबर  स्कॉटलंड विरुद्ध श्रीलंका  दुबई

1  ऑक्टोबर  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका  दुबई

1  ऑक्टोबर  इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड  दुबई

1  ऑक्टोबर  ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज  दुबई

भारताला अद्याप मिळालेले नाही विजेतेपद 

भारतीय महिला संघाला अद्याप टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद मिळालेले नाही. या संघाने 2020 मध्ये अंतिम सामना खेळला होता, परंतु या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. आतापर्यंत केवळ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांनी महिला टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे.

तुम्ही कुठे पाहणार सामना?

भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांना टी-20 विश्वचषक 2024 चा थेट सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येणार आहे. डिस्ने+हॉटस्टार ऍप्लिकेशनवरही ते मोफत पाहता येते.