ICC Test Rankings: न्यूझीलंड कर्णधार Kane Williamson पुन्हा नंबर-1 च्या सिंहासनावर विराजमान तर विराट कोहलीचे स्थान अबाधित, पाहा संपूर्ण यादी

30 वर्षीय विल्यमसनला भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात अनुक्रमे 49 आणि नाबाद 52 धावांच्या खेळीचा फायदा घेत पुन्हा एका आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये मानाचे स्थान मिळवले.

केन विल्यमसन आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

ICC Test Rankings: न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) पुन्हा एकदा आयसीसी कसोटी फलंदाजांच्या (Test Rankings) क्रमवारीत नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान झाला आहे. 30 वर्षीय विल्यमसनला भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship Final) सामन्यात अनुक्रमे 49 आणि नाबाद 52 धावांच्या खेळीचा फायदा घेत पुन्हा एका आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये मानाचे स्थान मिळवले. विल्यमसनने यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथला (Steve Smith) दुसऱ्या स्थानावर ढकलले. विल्यमसनचे एकूण 901 गुण असून स्मिथ 891 गुणांसोबत त्याच्या फक्त 10 च्या फरकाने पिछाडीवर आहे. विल्यमसनने दोन आठवड्यांपूर्वी स्मिथच्या हाती अव्वल स्थान गमावले होते. तसेच भारतीय कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) चौथे स्थान अबाधित राहिले हे. कोहलीकडे एकूण 812 गुण आहेत. (ICC WTC Final दरम्यान Ravindra Jadeja याला मिळाली खुशखबर, बनला जगातील नंबर 1 कसोटी अष्टपैलू)

दरम्यान, हॅम्पशायर बाऊल येथे दुसऱ्या डावात विल्यमसनसह नाबाद 47 धावा करणारा रॉस टेलरने तीन स्थानांची उडी घेत 14 व्या स्थानावर झेप घेतली आहे तर डेव्हन कॉनवे 42 व्या स्थानावर पोहचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज काईल जेमीसनने गोलंदाजांच्या यादीत कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 13 वे स्थान पटकावले आहे. जेमीसनने भारताविरुद्ध विजेतेपदाच्या सामन्यात बॉलने अनुक्रमे 31/5 आणि 30/2 अशा कामगिरीची नोंद केली होती. दुसरीकडे, भारताकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणेला एकमेव उल्लेखनीय फायदा झाला आहे. त्याने 49 आणि 15 धावांची खेळी करून ज्याने त्याला 13 व्या स्थान मिळवून दिले. कसोटी फलंदाजांच्या पहिल्या 10 खेळाडूंमध्ये एकूण तीन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. सलामी फलंदाज रोहित शर्मा सहाव्या तर रिषभ पंत सातव्या स्थानावर घसरला आहे.

तसेच चॅम्पियनशिप फायनल सामन्यादरम्यान नंबर वन अष्टपैलूचा मान मिळवलेल्या रवींद्र जडेजाची देखील दुसऱ्या स्थानावर घसरण झाली असून वेस्ट इंडियन जेसन होल्डर पुन्हा पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. जडेजा 377 गुणांसह इंग्लंडच्या बेन स्टोक्स समवेत आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif