ICC T20I Rankings: बाबर आझम टी-20 क्रमवारीत अव्वलस्थानी कायम, डेविड मालनची टॉप-5 मध्ये एंट्री; टीम रँकिंगमध्ये इंग्लंड दुसर्या तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर
इंग्लंड-पाकिस्तान टी-20 मालिकेनंतर आयसीसीने नुकतंच रँकिंग जाहीर केल्या आहेत. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम 869 गुणांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानाचा टी-20 फलंदाज आहे. मालिकेत एकूण 84 धावांसह डेविड मालन पहिल्या पाचमध्ये परतला आहे. मोहम्मद हाफिज आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनाही क्रमवारीत फायदा झाला.
इंग्लंड (England)-पाकिस्तान (Pakistan) टी-20 मालिकेनंतर आयसीसीने नुकतंच रँकिंग जाहीर केल्या आहेत. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) 869 गुणांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानाचा टी-20 फलंदाज आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या मालिकेत शानदार कामगिरीनंतर मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez) आणि शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) यांनाही क्रमवारीत फायदा झाला. चुरशीच्या लढतीत पाकिस्तानने 5 धावांनी विजय मिळवला आणि मालिका 1-1 ने अनिर्णित राहिली. हाफिजने नाबाद 69 आणि 86 धावा फटकावल्या आणि 27 स्थानांची झेप घेतली, ज्यामुळे तो अव्वल-50 मध्ये परतला. बाबर आणि फखर जमाननंतर तो आता 44व्या स्थानावर आहे आणि पाकिस्तानचा तिसरा क्रमांकाचा फलंदाज आहे. 36 आणि 1 धावांच्या खेळीनंतर फखर जमानला दोन स्थानांवर घसरला आहे आणि 23 व्या स्थानी पोहचला. (ENG vs PAK 3rd T20: इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तानचा एकमेव विजय; मोहम्मद हाफिज, हैदर अलीच्या खेळीने अंतिम टी-20 सामन्यात 5 धावांनी विजयासह मालिका 1-1 ने ड्रॉ)
इंग्लंडच्या टॉम बंटनला (Tom Banton) देखील क्रमवारीत फायदा झाला आहे. पावसामुळे वाया गेलेल्या पहिल्या सामन्यात बंटनने 71 धावांच्या खेळीने 152 स्थानांची झेप घेत 43 व्या स्थानावर आणले आहे. मालिकेत एकूण 84 धावांसह डेविड मालन (Dawid Malan) पहिल्या पाचमध्ये परतला आहे. जॉनी बेअरस्टोने देखील कारकीर्दीतील सर्वोत्तम 22 व्या स्थानावर पोहचला. गोलंदाजांमध्ये दुसर्या सामन्यात पाकिस्तानच्या लेगस्पिनर शादाब खानच्या 34/3 सह एकूण 5 विकेटने त्याला आठवे स्थान मिळवून दिले आहे. इंग्लंडचा टॉम कुरन आणि पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी दोघांनीही संयुक्त 20 वे स्थान मिळविले आहे.
दुसरीकडे, पुरुषांच्या टी-20 संघांच्या क्रमवारीत इंग्लंड दुसर्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या आणि पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड-पाकिस्तानमधील पहिला टी-20 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने सोप्पा विजय मिळवला, तर अखेरच्या सामन्यात पाकिस्तानने पुनरागमन केले आणि मालिका बरोबरीत सोडवली. दुसरीकडे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) अध्यक्ष इयान वॅटमोर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्यास देश सुरक्षित असेल तर इंग्लड नक्की पाकिस्तान दौरा करेल. 2005-06 पासून इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. 2009 मध्ये श्रीलंका क्रिकेट टीमच्या बसवर दहशतवादी हल्ल्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय टीमने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)