T20 World Cup 2022 Schedule, Free PDF Download Online: शनिवारपासुन सुरु होणार सुपर 12 चे सामने, असे डाउनलोड करा वेळापत्रक
भारतासह जगभरातील आठ संघ आतापर्यंत T20 विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत, त्यापैकी श्रींलका संघाने सुपर 12 मध्ये प्रवेश केला आहे.
टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सुपर 12 सामने (Super 12) 22 ऑक्टोबरपासून खेळवण्यात येणार आहे. ज्यामध्ये 12 संघ सामने खेळणार आहे. दरम्यान, 16 ऑक्टोबरपासून सराव सामने आणि क्वालिफायर सामने खेळवले गेले आहे. यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ 22 ऑक्टोबरला आमनेसामने येतील, तेव्हाच अधिकृतरीत्या सुरुवात होईल. भारतासह जगभरातील आठ संघ आतापर्यंत T20 विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत, त्यापैकी श्रींलका संघाने सुपर 12 मध्ये प्रवेश केला आहे.T20 विश्वचषक 2022 च्या वेळापत्रकाचे वैशिष्ट्य म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना जो 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. दरम्यान, तुम्ही आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 चे पूर्ण वेळापत्रक PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता. दिलेल्या सामन्याच्या वेळा या भारतीय वेळेनुसार नसुन ते लवकरच अपडेट केले जाईल.
इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान हे गट 1 मध्ये एकत्र आले असून भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे गट 2 मध्ये आहेत. पात्रता टप्प्यातील (पहिल्या फेरीतील) चार संघांना या दोन गटांमध्ये समान रीतीने विभागले जाईल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याव्यतिरिक्त, अॅशेस प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (दुसरऱ्या फेरीतील) यांच्यातही लढत आहे. (हे देखील वाचा: Team India चे मेलबर्नमध्ये स्वागत; Rohit Sharma ने कापला केक, पहा व्हिडीओ)
टी-20 विश्वचषक 2022 पूर्ण वेळापत्रक
सिडनी क्रिकेट ग्राउंड बुधवार 9 नोव्हेंबर रोजी पहिल्या उपांत्य फेरीचे आयोजन करेल, दुसऱ्या दिवशी अॅडलेड ओव्हल येथे दुसरा उपांत्य सामना होईल. आयसीसी पुरुष T20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे.