ICC Men's T20 World Cup 2020 Postponed: कोरोनामुळे आयसीसीने टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलले
याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धेचे (ICC Men's T20 World Cup 2020) आयोजन करण्याबद्दल असमर्थता दर्शवल्यानंतर अखेरीस आयसीसीने मोठी घोषणा केली आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा क्रिकेट विश्वाला मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धेचे (ICC Men's T20 World Cup 2020) आयोजन करण्याबद्दल असमर्थता दर्शवल्यानंतर आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धेचे आयोजन अखेरीस आयसीसीने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता भारतीय नियामक मंडळासमोर (BCCI) आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे (IPL 13th Season) आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे बीसीसीआय लवकरच आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल अधिकृत घोषणा करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. यातच ऑस्ट्रेलिया सरकारनेही कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन घोषीत केला आहे. ऑस्ट्रेलियावरचे आर्थिक संकट लक्षात घेता, विश्वचषकाचे आयोजन करणे अशक्य असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याआधीच जाहीर केले होते. त्यानंतर आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलणे जाणे ही फक्त एक औपचारिकता मानली जात होती. हे देखील वाचा- IND vs AUS 2008 Sydney Test: 'माझ्या दोन चुकांमुळे टीम इंडियाने सामना गमावला,' अंपायर स्टिव्ह बकनर यांनी अखेरीस दिली चुकांची कबुली
एएनआयचे ट्वीट-
ऑस्ट्रेलिया होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धेबाबतच्या निर्णयावर इंडियन प्रीमिअर लीगचेही भवितव्य अवलंबून असल्याने भारतीय नियामक मंडळाचे त्याकडे बारीक लक्ष होते. यापूर्वी याच विषयासाठी झालेल्या बैठकीत आयसीसीने वेट ऍन्ड वॉचची भूमिक घेतली होती. त्यामुळेच आजचा निर्णय बीसीसीआयसाठी महत्वपूर्ण होता. जर यावर्षी आयपीएल रद्द झाली. तर, बीसीसीआयला आर्थिक नुकसानीला सामोरे जावा लागणार आहे.