ICC ODI Rankings Bowlers: पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी बनला वनडेत जगातील नंबर 1 गोलंदाज, ICC क्रमवारीत मोठे बदल
मात्र, तो बराच काळ एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. बुमराह न खेळता आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आला आहे.
ICC ODI Rankings Bowlers: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तुफानी गोलंदाजी करणारा पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज वनडे क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. ताज्या आयसीसी क्रमवारीत शाहीन वनडेमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. शाहीन आफ्रिदीने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शानदार गोलंदाजी केली. पाकिस्तानने ही मालिका 2-1 ने जिंकली. 22 वर्षांनंतर पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलियात वनडे मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. या विजयात शाहीन आफ्रिदीचीही महत्त्वाची भूमिका होती. (हेही वाचा - PAK Beat AUS 3rd ODI 2024: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून विजय, मालिकेवर 2-1 ने कब्जा )
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत शाहीन आफ्रिदीने तीन क्रमांकाची झेप घेतली आहे. त्याचे रेटिंग आता 696 वर पोहोचले आहे, जे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम आहे. अफगाणिस्तानचा रशीद खान 687 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शाहीन आफ्रिदी हा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शाहीनने तीन सामन्यांत 12.62 च्या सरासरीने आठ विकेट्स घेतल्या होत्या. या मालिकेत हरिस रौफने सर्वाधिक 10 विकेट घेतल्या.
बुमराहला न खेळता ही झाला फायदा
झाला आहे. मात्र, तो बराच काळ एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. बुमराह न खेळता आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आला आहे. त्याचबरोबर भारताच्या मोहम्मद सिराजनेही ताज्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. त्यानेही दोन स्थानांनी झेप घेत सातव्या स्थानावर झेप घेतली आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झम्पा आणि जोश हेझलवूड यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ॲडम झाम्पा चौथ्या स्थानावरून 9व्या स्थानावर घसरला आहे. जोश हेझलवूड तीन स्थानांनी घसरून 10व्या स्थानावर आला आहे.