ICC Men’s Cricket World Cup 2023: विश्वचषकापूर्वी टीम इंडिया करणार यांच्याशी दोन हात, आयसीसीकडून सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर; पहा

वेळापत्रकानुसार सराव सामने 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. ज्यामध्ये सर्व संघ आपले 15 खेळाडू उतरवू शकतील.

ICC World Cup 2023 (Photo Credit - Twitter)

World Cup 2023 Warm Up matches: भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची (ODI World Cup 2023) तयारी पूर्ण झाली आहे. या विश्वचषकापूर्वी सर्व संघ सराव सामने खेळणार आहेत. त्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. इंग्लंड आणि नेदरलँड्सविरुद्धच्या सराव सामन्यांमध्ये टीम इंडिया (Team India) आपली ताकद दाखवेल. विश्वचषक स्पर्धेतील सर्व दहा संघ 2-2 सराव सामने खेळतील. वेळापत्रकानुसार सराव सामने 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. ज्यामध्ये सर्व संघ आपले 15 खेळाडू उतरवू शकतील. (हे देखील वाचा: ICC Men’s Cricket World Cup 2023: विश्वचषक 2023 साठी BookMyShow वर बुक करता येणार तिकिटे; जाणून घ्या कधी होणार उपलब्ध)

टीम इंडिया कोणत्या संघांशी भिडणार?

टीम इंडिया सराव सामन्यात इंग्लंड आणि नेदरलँड्सशी भिडणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे खेळणार आहे. ज्यामध्ये गतविजेता विश्वविजेता संघ इंग्लंड समोर असेल. दुसरीकडे, 3 ऑक्टोबरला भारताची स्पर्धा नेदरलँडशी होणार आहे. सराव सामने दुपारी 2 वाजता सुरू होतील.

या शहरांमध्ये सराव सामने खेळवले जातील

1. गुवाहाटी

2. हैदराबाद

3. तिरुवनंतपुरम

विश्वचषक 2023 सराव सामन्यांचे वेळापत्रक

29 सप्टेंबर

30 सप्टेंबर

2 ऑक्टोबर

3 ऑक्टोबर

विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात

भारतात होणारा एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया या विश्वचषकात आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी पाचवेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. यानंतर 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठा सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे.