T20 World Cup 2021 तून अफगाणिस्तानची होणार एक्सिट? ‘या’ कारणामुळे ICC उचलू शकते मोठे पाऊल

टीमला तालिबानच्या झेंड्याखाली सहभागी होण्यासाठी भाग पाडले गेले तर त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात. प्रोटोकॉलनुसार, विश्वचषक स्पर्धेत खेळणारा सर्व राष्ट्रांनी त्यांचे झेंडे सादर करायचेच असते.

अफगाणिस्तान संघ (Photo Credit: Getty)

T20 World Cup 2021: अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये (Afghanistan Cricket) सध्या अराजक स्थितीत आहे. तालिबानने (Taliban) देशाच्या राजकीय क्षेत्राचा ताबा घेतल्याने देशाचा दृष्टिकोन बदलला आहे. देशाच्या पुरुष क्रिकेट संघाला पुन्हा क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी संघाची ओळख अद्यापही प्रश्नाखाली आहे. टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) 2021 स्पर्धेला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्याने, देशाच्या पुरुष संघाला अफगाणिस्तानच्या झेंड्याखाली (Afghanistan Flag) सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल की नाही हे पाहणे बाकी आहे. तालिबानच्या झेंड्याखाली टीमला सहभागी होण्यासाठी भाग पाडले गेले तर त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात. टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेत अफगाणिस्तानच्या सहभागाबाबत तालिबानचे मत अद्याप कळलेले नाही. पण, हमीद शिनवारीच्या (Hamid Shinwari) जागी नसीब झाद्रान खान यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय सर्किटवर स्वतःला ठळक करण्याच्या तालिबानच्या हेतूचे संकेत देते.

प्रोटोकॉलनुसार, टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व राष्ट्रांनी ते झेंडे सादर करावेत ज्या अंतर्गत ते सहभागी होणार आहेत. सहसा ही प्रक्रिया वादाचा विषय नाही परंतु अफगाणिस्तानच्या बाबतीत आहे. या स्पर्धेसाठी अफगाणिस्तानने तालिबानचा झेंडा सादर केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर आशियाई देशातील परिस्थितीबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी दबाव आणला जाईल. Telegraph UK मधील एका अहवालानुसार, आयसीसी कदाचित अफगाणिस्तानला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यावरच बंदी घालणार नाही तर त्यांना सदस्य राष्ट्रांपैकी एक म्हणून बाहेर काढू शकते. अफगाणिस्तान थेट टी-20 विश्वचषक 2021 च्या मुख्य ग्रुपसाठी पात्र ठरला आणि भारत, पाकिस्तान व न्यूझीलंडसह गट 2 मध्ये त्यांना स्थान देण्यात आले आहे. 17 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या क्वालिफायरमधील आणखी दोन संघ त्यांच्यात सामील होतील.

दरम्यान, यंदा महिन्याच्या सुरुवातीला, आयसीसीने अफगाणिस्तानमध्ये महिला क्रिकेटबद्दल चिंता व्यक्त केली होती. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानच्या पुरुष संघाविरुद्ध ऐतिहासिक कसोटी रद्द करण्याची चेतावणी देखील दिली आहे जर राष्ट्राने इतर सदस्य राष्ट्रांप्रमाणे महिला क्रिकेटला प्रोत्साहन दिले नाही. आयसीसीकडून पूर्ण सदस्य म्हणून अफगाणिस्तानला सध्या 5 लाख डॉलर्सचा निधी मिळतो. जर 17 पैकी 12 मंडळाच्या सदस्यांनी सध्याच्या स्थितीवर अफगाणिस्तानचे सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय घेतला तर सर्वोच्च मंडळाला तसे करण्यास भाग पाडले जाईल.