Live Cricket Streaming of India vs Australia ICC World Cup 2019: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर

आईसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 मधील 14 वा सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात लंडनच्या ओव्हल ग्राऊंडवर रंगणार आहे.

India vs Australia ICC World Cup 2019 (Photo Credits: File Photo)

IND vs AUS, ICC Cricket World Cup 2019: आईसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 मधील 14 वा सामना आज भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात लंडनच्या (London) ओव्हल ग्राऊंडवर (Oval Cricket Ground) रंगणार आहे. आज भारताची खरी कसोटी असून भारत ऑस्ट्रेलियावर मात करणार का? हे पाहण्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. वर्ल्डकपमधील भारताचा हा दुसरा सामना असून यापूर्वी दक्षिण ऑफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारत विजयी ठरला होता. तर ऑस्ट्रेलिया संघाचा हा तिसरा सामना असून पूर्वी झालेल्या अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामना ऑस्ट्रेलिया विजयी ठरली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची विजयी खेळी रोखण्याचा भारत नक्कीच प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलिया देखील हा सामना खिशात घालण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरले. (आज टीम इंडियाची खरी परीक्षा; फायनलचे दावेदार असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघासोबत लढत)

भारत-ऑस्ट्रेलिया या दोन्ही बलाढ्य संघात आज लढत होणार आहे. हा सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तसंच वर्ल्डकप मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा सामना तुम्ही ऑनलाइन HOTSTAR आणि STAR SPORTS वर पाहु शकता.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया नाणेफेक:

 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

असे असतील संघ:

भारत: विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, केदार जाधव, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, विजय शंकर, रोहित शर्मा, कुलदीप यादव.

आस्ट्रेलिया: एरॉन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडार्फ, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), नाथन कल्टर नाइल, पॅट कमिंस, उस्मान ख्वाजा, नाथन लॉयन, शॉन मार्श, ग्लॅन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वार्नर, एडम जाम्पा.