ICC Captains Month Poll: महेंद्रसिंह धोनी, केन विल्यम्सन, मिसबाह उल हक, स्टीव्ह वॉ यांपैकी शांत क्रिकेटर कोणता? 'या' खेळाडूने मारली बाजी

महेंद्रसिह धोनी (MS Dhoni), केन विल्यम्सन (Kane Williamson), मिसबाह उल हक (Misbah-ul-Haq), स्टीव्ह वॉ (Steve Waugh) हे क्रिकेटपटू नेहमी त्यांच्या संयमी खेळीसाठी ओळखले जातात.

Steve Waugh, MS Dhoni, Misbah-ul-Haq, Kane Williamson (Photo Credit: FB/ Instagram)

महेंद्रसिह धोनी (MS Dhoni), केन विल्यम्सन (Kane Williamson), मिसबाह उल हक (Misbah-ul-Haq), स्टीव्ह वॉ (Steve Waugh) हे क्रिकेटपटू नेहमी त्यांच्या संयमी खेळीसाठी ओळखले जातात. यातच आयसीसीने आपल्या ट्विटर हॅंडलवर क्रिकेट विश्वातील सर्वांत शांत खेळाडू कोण आहे? असा प्रश्न विचारला होता. तसेच या प्रश्नासाठी आयसीसीने चाहत्यांकडून त्यांची मत मागवली होती. हा पश्न सर्वांसाठी कठीण होता. मात्र, या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने बाजी मारली आहे. चाहत्यांनी या चौघांपैकी महेंद्रसिंह धोनीला अधिक पसंती दर्शवली आहे. धोनी हा आपल्या कुशल नेतृत्वामुळे क्रिकेट विश्वात प्रसिद्ध होता. पण निवृत्तीनंतरही चाहते धोनीला अजूनही विसरु शकले नसल्याचे चिन्ह दिसत आहेत.

आयसीसीने विचारलेल्या प्रश्नावर चाहत्यांनी तब्बल 71.5 टक्के मत ही धोनीला दिली आहेत. धोनीनंतर सर्वाधिक मत ही केन विल्यम्सनला मिळाली आहेत. त्याला 16.8 टक्के एवढी मत मिळाली आहेत. तर, मिसबाह उल हकला 9.8 टक्के आणि स्टीव्ह वॉला 1.9 टक्के मत मिळाली आहेत. त्यामुळे धोनीचा यामध्ये एकहाती विजयी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. हे देखील वाचा- IND vs ENG Series 2021: माझ्या होमटाऊनमध्ये आपले स्वागत आहे; इंग्लंडचा संघ भारतात दाखल होताच गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे ट्वीट

आयसीसीचे ट्विट-

सध्या महेंद्रसिंह धोनी आपल्या नव्या लूकमध्ये चर्चेत आहे. सध्या धोनीच्या नव्या लुकचे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.दरम्यान, या नवीन लुकमध्ये धोनी अजून तरुण दिसत आहे, अशी प्रतिक्रीया काही चाहत्यांनीही दिली आहे. महत्वाचे म्हणजे, धोनीला आयपीएलच्या मागील हंगामात खास कामगिरी बजावता आली नाही. मात्र, आयपीएलच्या पुढील हंगामात तो चांगली कामगिरी करून दाखवेल, असा विश्वास चेन्नई सुपर किंग्जच्या समर्थकांना आहे.