ICC ची मोठी घोषणा, 15 वर्षाखालील खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय किंवा Under-19 क्रिकेट खेळण्यावर घातली बंदी

आंतरराष्ट्रीय व अंडर-19 क्रिकेट खेळण्यासाठी किमान वयाची आवश्यकता आयसीसीला समजली आहे. पुरुष खेळाडू असो किंवा महिला खेळाडूं, 15 वर्षांखालील कोणत्याही खेळाडूला अंडर-19 किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी दिली जाणार नाही, असे क्रिकेट संघटनेने म्हटले आहे.

(फोटो सौजन्य-फेसबुक)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय व अंडर-19 क्रिकेट खेळण्यासाठी किमान वयाची आवश्यकता आयसीसीला समजली आहे. पुरुष खेळाडू असो किंवा महिला खेळाडूं, 15 वर्षांखालील कोणत्याही खेळाडूला अंडर-19 किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी दिली जाणार नाही, असे क्रिकेट संघटनेने म्हटले आहे. “आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी कमीतकमी वयोमर्यादा लागू करण्याबाबत मंडळाने पुष्टी केली की आयसीसी कार्यक्रम, द्विपक्षीय क्रिकेट आणि अंडर-19 क्रिकेट या सर्व क्रिकेटमध्ये लागू असेल. पुरुष, महिला किंवा अंडर-19 प्रकारात खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंचे वय आता किमान 15 वर्षे झालेच पाहिजे," आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले. कोविड महामारीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नियमात बदल केल्याची पुष्टी देताना आयसीसीने ही घोषणा केली. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या सरासरीवरुन अंतिम फेरीतले दोन संघ निवडले जाणार आहेत. (World Test Championship: ICC च्या नियमांमध्ये बदल, ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या अव्वल स्थानावर; टीम इंडियाची घसरण)

दरम्यान, आयसीसीने पुढे म्हटले की, "अपवादात्मक परिस्थितीत, सदस्य मंडळ 15 वर्षाखालील खेळाडूला संघासाठी खेळवण्याकरिताआयसीसीकडे अर्ज करू शकेल. यात ज्या खेळाडूंचा अनुभव आणि मानसिक विकास व आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मागण्यांचा सामना करण्यास ते सक्षम आहेत, हे चांगले असल्याचे दर्शवितात.” असं असलं तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप कमी खेळाडू आहेत ज्यांनी कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. वयाच्या 14 व्या वर्षी पदार्पण करणारा पाकिस्तानचा हसन रझा आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात युवा खेळाडू आहे. सक्रिय क्रिकेटरमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह सर्वात कमी वयाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.

15 वर्ष पूर्ण कारण्यापुवी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणारा रझा हा एकमेव पुरुष असला तरी महिला क्रिकेटमध्ये असंख्य खेळाडू ज्यांनी कमी वयात आपल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहेत. वयाच्या 11 व्या वर्षी जर्सीची निया ग्रीग ही महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भाग घेणारी सर्वात कमी वयाची खेळाडू आहे.