ICC Team Of The Decade: आयसीसीकडून दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी संघाची घोषणा; भारतीय खेळाडूंकडे तिन्ही संघाचे नेतृत्व
जगभरातील 15 लाखाहून अधिक चाहत्यांनी 53 दशलक्ष मते दिली आहेत.
ICC Awards 2020: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने 2010 ते 2020 या दशकातील एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. दशकातील सर्वोत्तम 11 खेळाडूंची आयसीसीने निवड केली आहे. या तिन्ही संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडूंकडे आहे. भारताचा माजी खेळाडू महेंद्र सिंह धोनी एकदिवसीय आणि टी-20 संघाचे नेतृत्व करणार आहे. तर, कसोटी संघाचे कर्णधारपद भारताचा कर्णधार विराट कोहली याच्याकडे सोपवण्यात आली आहे. तिन्ही संघामध्ये स्थान पटकावणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे, या संघात पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचा समावेश नाही.
आयसीसी आवार्डमध्ये गेल्या दहा वर्षात सर्वोकृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंसाठी निवड केली जाते. यंदा प्रथमच चाहत्यांना मत करण्याची संधी मिळाली होती. दरम्यान, जगभरातील 15 लाखाहून अधिक चाहत्यांनी 53 दशलक्ष मते दिली आहेत. हे देखील वाचा- IND vs AUS 2nd Test 2020-21: मेलबर्न येथे बॉक्सिंग डे टेस्टच्या दुसऱ्या दिवशी बनले 'हे' प्रमुख रेकॉर्ड, वाचा सविस्तर
एकदिवसीय संघ –
एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स, शाकिब अल हसन, बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, इम्रान ताहिर, लसिथ मलिंगा
टी20 संघ –
एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रोहित शर्मा, ख्रिस गेल, ऍरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.
कसोटी संघ –
विराट कोहली(कर्णधार) अॅलिस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, स्टिव्ह स्मिथ, कुमार संगकारा (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, आर. अश्विन, बेन्ट स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेस्म अँडरसन