Protest Against Indian Farm Laws at MCG: शेतकरी आंदोलनाचे लोण ऑस्ट्रेलियापर्यंत, MCG बाहेर कृषि कायद्याविरोधात शेतकर्‍यांना पाठींबा देत समर्थकांची पोस्टरबाजी (Watch Video)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु असलेल्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यादरम्यान शेतकरी आंदोलनाला लोकांचा पाठिंबा पाहायला मिळाला. MCG स्टेडियम बाहेर कृषि कायद्याविरोधात शेतकर्‍यांना पाठींबा देत अनेकांनी पोस्टरबाजी केली.

MCG बाहेर कृषि कायद्याविरोधात शेतकर्‍यांना पाठींबा देत आंदोलन (Photo Credit: Twitter)

Protest Against Indian Farm Laws at MCG: भारतात मागील अनेक दिवसांपासून पंजाब (Punjab) आणि हरियाणामधील (Haryana) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दिल्लीला धडक देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे (Farmers Protest) पडसाद सातासमुद्रापार उमटू लागले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न (Melbourne) शहरात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) सुरु असलेल्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यादरम्यान लोकांचा पाठिंबा पाहायला मिळाला. MCG स्टेडियम बाहेर कृषि कायद्याविरोधात शेतकर्‍यांना पाठींबा देत अनेकांनी पोस्टरबाजी केली. मागील अनेक दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत ते येथे आंदोलनाला बसले आहे. केंद्र सरकारसोबत अनेक बैठका होऊनसुद्धा अजून यावर समाधानकारक तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी शेतकरी ठाम आहेत. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. (PM Narendra Modi on Farmers Protest: शेतकरी आंदोलन, ममता बॅनर्जी ते APMC, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, पीएम किसान सम्मान निधी योजना निधीवाटपावेळीच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे)

दरम्यान, शुक्रवार 25 डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांकडून त्यांचे अनुभव जाणून घेतले. सरकारने ज्या योजना सुरु केल्या त्याचा त्यांना कसा फायदा झाला? गावातील तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना त्यांनी याची माहिती दिली का? अशा अनेक बाबी जाणून घेतल्या. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी  (Atal Bihari Vajpayee) यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर देशभरातील 2500 चौपालांमधील शेतकर्‍यांना संबोधित केले.

दुसरीकडे, माजी इंग्लंड फिरकी गोलंदाज मोंटी पनेसरने देखील मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे आणि केंद्र सरकारला इशारा दिला. पनेसरने पंतप्रधान मोदींना टॅग करत एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले, "तुम्ही घेतलेला निर्णय मागे घेण्याची गेलं आली आहे. सिंह (शीख) तुमच्याकडे येत आहेत, जोवर तुम्ही निर्णय बदलत नाही तोवर." शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमेवर गर्दी होत आहे, आणि कोरोनाचा धोका लक्षात घेता आंदोलकांना हटवण्यात यावं अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या काही दिवसात सुनावणी होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif