Napier Weather Updates Live: IND vs NZ मध्ये होणार आज तिसरा T20 निर्णायक सामना; कसे असेल हवामान, वाचा खेळपट्टीचा अहवाल

या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही.

IND vs NZ (Photo Credit - Twitter)

भारत आणि न्युझीलंड (IND vs NZ) मधला तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना आज नेपियर मध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याद्वारे कोण विजेता असेल याचा निर्णय होईल. हा सामना भारताने जिंकला तर त्यांच्या नावावर होईल. त्याचबरोबर न्यूझीलंड संघाला हा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणायची आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. यानंतर दुसऱ्या सामन्यातही पावसामुळे खेळ 27 मिनिटे थांबवण्यात आला. मात्र, यामुळे षटकांमध्ये कोणतीही कपात झाली नाही. आता तिसऱ्या सामन्यातही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

नेपियरमध्ये कसे असेल हवामान?

संध्याकाळपर्यंत नेपियरमध्ये अंशतः ढगाळ राहील, परंतु पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, सामन्याच्या वेळी पावसाची 70 टक्के शक्यता आहे. अशा स्थितीत पाऊस दुसऱ्या डावात अडथळा आणू शकतो. तथापि, सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही डावांमध्ये किमान पाच षटकांचा खेळ असावा. अशा स्थितीत सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता दाट आहे.

कशी असेल खेळपट्टी?

नेपियरचे मैदान हे नेहमीच फलंदाजांसाठी उपयुक्त ठरले आहे. अशा परिस्थितीत या सामन्यातही पावसाची शक्यता आहे. सूर्यकुमार यादवने दुसऱ्या टी-20 मध्ये शतक झळकावले. या सामन्यातही त्याला मोठी धावसंख्या करण्याची संधी असेल. (हे देखील वाचा: India Vs New Zealand: भारत विरुध्दच्या अंतीम सामन्यात न्यूझिलंडचा कर्णधर केन विल्यमसन गैरहजर, दुखापतीवरील वैद्यकीय उपचारासाठी अनुपस्थिती)

नेपियर मैदानावर कसा आहे रेकॅार्ड

नेपियरच्या मैदानावर आतापर्यंत चार टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी दोन सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आणि दोन सामने नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले. अशा स्थितीत या मैदानात नाणेफेकीचे महत्त्व ठरणार आहे. न्यूझीलंड संघाने येथे चार सामने खेळले असून दोन जिंकले आहेत. या मैदानावर भारतीय संघ प्रथमच टी-20 सामना खेळणार आहे.