IND VS BAN 1st T20I Live Streaming: कसोटीनंतर टीम इंडिया टी-20 मालिकेतही करणार बांगलादेशचा 'सफाया'! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग
टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. त्याचबरोबर नजमुल हुसेन शांतो बांगलादेशचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर, दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका (IND vs BAN T20I Series 2024) खेळली जाईल. या मालिकेतील पहिला सामना रविवार म्हणजेच 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 28 सप्टेंबर रोजी बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. त्याचबरोबर नजमुल हुसेन शांतो बांगलादेशचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश पहिला सामना कधी अन् कुठे खेळवला जाणार?
भारतीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील पहिला टी-20 सामना 6 ऑक्टोबर (रविवार) रोजी श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम, ग्वाल्हेर येथे भारतीय वेळेनुसार (IST) संध्याकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 06:30 वाजता होईल
टीव्हीवर अन् ओटीटीवर कुठे पाहणार लाइव्ह सामना?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर विनामूल्य केले जाईल. तसेच, भारतातील Sports-18 नेटवर्क टीव्ही चॅनलवर सामना प्रसारित केला जाईल. (हे देखील वाचा: IND vs BAN 1st T20I 2024 Preview: रविवारपासून रंगणार भारत विरुद्ध बांगालदेशमध्ये टी-20 चा थरार! हेड टू हेड, मिनी बॅटल अन् स्ट्रीमिंगसह जाणून घ्या संपूर्ण तपशील)
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, रियान पराग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा.
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तनजीद हसन, लिटन दास (विकेटकीपर), तौहीद ह्रदोय, मेहदी हसन मिराज, महमुदुल्ला, झकर अली, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, रिशाद हुसेन आणि तन्झिम हसन साकिब.