How To Download Hotstar & Watch KKR Vs CSK Live Match: कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
कोलकाता नाईट रायडर्स आणि आणि चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: File Image)

KKR Vs CSK 21st IPL Match 2020: आयपीएल (IPL) 13च्या 21व्या सामन्यात आज अबू धाबी येथे कोलकाता नाईट रायडर्ससमोर (Kolkata Knight Riders) लयीत परतलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) आव्हान असेल. मागील तीन पराभवानंतर विजयानंतर सीएसके संघ लयीत परतला आहे. कोलकाताचा संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी असला तरी त्यांचा फलंदाजी क्रम कमजोर दिसत आहे. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक आणि अष्टपैलू आंद्रे रसेल हे संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कार्तिकने आजवर खेळलेल्या 4 सामन्यात केवळ 37 धावा केल्या आहेत, तर रसेलनेही 4 सामन्यांत 48 धावांचे योगदान दिले असून 4 विकेटही घेतल्या आहेत. दुसरीकडे, हंगामातील सलामीचा सामना सामना जिंकल्यानंतर चेन्नईने सलग 3 सामने गमावले. त्यानंतर त्याने मागील सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबला 10 गडी राखून पराभूत केले. सलामीवीर फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसन यांनी जबरदस्त खेळी खेळली. अशा परिस्थितीत चेन्नई आजचा सामना जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. (KKR vs CSK, IPL 2020 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स आणि आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्ही टीव्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.

हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत-

- प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

- यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

- इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

- यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

- साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.