How to Download Hotstar & Watch CSK vs DC IPL 2021 Match 2: चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी हॉटस्टार कसं डाउनलोड कराल? जाणून घ्या
रिषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्स आज संध्याकाळी महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला टक्कर देईल. एकीकडे अनुभवी कर्णधार धोनी तर दुसरीकडे पंत पहिल्यांदा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून डेब्यू करेल. चाहत्यांना घरी बसल्याच आयपीएलचा आनंद घ्यावा लागेल आणि त्यासाठी Disney+ Hotstar हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
CSK vs DC IPL 2021 Match 2: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) आज मोठा धमाकेदार सामना होण्याची शक्यता आहे. गुरू आणि शिष्य मैदानावर उतरतील परंतु एकमेकांसह नसून विरोधी बनून. रिषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आज संध्याकाळी महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) टक्कर देण्यासाठी मैदानात उतरेल. एकीकडे अनुभवी कर्णधार धोनी तर दुसरीकडे पंत पहिल्यांदा आयपीएल (IPL) मध्ये कर्णधार म्हणून डेब्यू करेल. श्रेयस अय्यरच्या दुखापतीनंतर पंतला कर्णधारपद देण्यात सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) चेन्नई आणि दिल्ली संघ आज आमने-सामने येणार आहेत. यंदाचे इंडियन प्रीमियर लीग यंदा संपूर्णपणे भारतात आयोजित केले जाणार असले तरी कोविड-19 पुन्हा एकदा देशभरात पाय पसरवत असल्याने यंदा मात्र चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामन्याचा आनंद घेता येणार नाही. अशास्थितीत चाहत्यांना घरी बसल्याच आयपीएलचा आनंद घ्यावा लागेल आणि त्यासाठी Disney+ Hotstar हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. (CSK vs DC IPL 2021: दोन नव्या खेळाडूंचं पदार्पण, पहा कसा असेल चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग XI)
हॉटस्टार एक लोकप्रिय ऑनलाइन डिजिटल मनोरंजन प्लॅटफॉर्म आहे. Disney+ Hotstar यंदा आयपीएलचे स्ट्रीम पार्टनर आहेत आणि सीएसके व दिल्ली कॅपिटल्स संघातील सामना लाईव्ह प्रसारित केला जाईल. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Diseny+ Hotstar डाउनलोड करू शकता. दरम्यान, दोन्ही संघातील आजचा आयपीएलचा सामना लाइव्ह पाहण्यासाठी Android यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल, तर Apple मोबाईल यूजर्ससाठी अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. Disney+Hotstar डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या सोप्प्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
1. हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. आपल्या प्ले स्टोअर वर जा आणि हॉटस्टार शोधा.
2. मग इन्स्टॉल पर्यायवर जाऊन क्लिक करा आणि आपल्या फोनमध्ये अॅप इन्स्टॉल करा.
3. आता, आपल्या अॅप्लिकेशन मेनूमध्ये किंवा होम स्क्रीनवर आपल्याला एक हॉटस्टार अॅपचे चिन्ह दिसेल.
4. आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटने साइन इन करुन अॅप उघडू शकता किंवा आवश्यक तपशील प्रदान करून साइन अप करू शकता.
5. आता आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा स्पर्धा जसे की आयपीएल, टीव्ही शो, चित्रपट आणि बरेच काही पाहू शकता.
हॉटस्टार अॅपद्वारे आपण आजचा सामना लाइव्ह आपल्या मोबाईलवर पाहू शकता. आपण आपल्या फोनवर सहजपणे हा अॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. आयपीएलचे सामने यंदा हॉटस्टार हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, पंजाबी आणि मराठी अशा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.