How to Download Hotstar & Watch SRH vs KKR Live Match: सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: File Image)

SRH vs KKR IPL 2020 Live Match: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या सत्रात रविवारी दोन सामने खेळले जाणार आहेत. दिवसाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात होणार आहे. मागील दोन्ही सामन्यात दोन्ही संघांचा पराभव झाला आहे. सध्या कोलकाताचा संघ चौथ्या स्थानावर आहे तर हैदराबाद पाचव्या स्थानावर आहे. हंगामाच्या मध्यात दोन्ही संघांमधील हा दुसरा सामना असेल. मागील सामना कोलकाताने 7 विकेट्सने जिंकला होता. दोन्ही संघांना विजयी मार्गावर परतण्याची गरज आहे आणि यासाठी अधिक चांगल्या खेळाची आवश्यकता असेल. सनरायजर्स आणि नाईट रायडर्समधील आजच्या सामना अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

कोरोना व्हायरसचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवली जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्हाला या लीगमधील सामने टीव्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टार अ‍ॅप वर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणारा आजचा सामना देखील पाहता येणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.

पाहा हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत:

1. प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

2. यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.