How to Download Hotstar & Watch KXIP vs SRH Live Match: किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: File Image)

KXIP vs SRH 43rd IPL Match 2020: शनिवारी, आज इंडियन प्रीमियर लीग (Indain Premier League) 2020 च्या 43व्या रोमांचकारी सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) सामना सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) होईल. आयपीएल 2020 मध्ये दोन्ही संघांनी त्यांच्या 10-10 सामन्यांमध्ये अनुक्रमे चार विजय मिळवले आहेत आणि आजच्या सामन्यातील विजय एका संघाचे प्ले ऑफ गाठण्याच्या आशा कायम ठेवतील तर दुसऱ्या टीमचे स्वप्न भंगेल. याशिवाय यंदाच्या मोसमात दोन्ही संघांना अनुक्रमे सहा पराभवांचा सामना करावा लागला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये सध्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघ 8 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे तर सनरायझर्स हैदराबादचा संघ 8 गुणांसह पण +0.092 च्या चांगल्या रनरेटच्या जोरावर गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. हैदराबाद आणि पंजाबमधील आजचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघांना प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी विजय मिळवणे गरजेचे असल्याने आजचा सामना रंगतदार होईल करत दोन्ही संघ विजयासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करतील. (KXIP vs SRH, IPL 2020 Live Streaming: किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

कोरोना व्हायरसचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवली जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्हाला या लीगमधील सामने टीव्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टार अ‍ॅप वर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणारा आजचा सामना देखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.

पाहा हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत:

1. प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

2. यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.