How to Download Hotstar & Watch DC vs KKR Live Match: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
इंडियन प्रीमिअर लीगच्या 16व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने-सामने येतील. डिस्नी+ हॉटस्टारवर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आजचा सामना आपण पाहू शकता. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
DC vs KKR, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 16व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आमने-सामने येतील. आयपीएलच्या 13व्या सत्रातील हा दुसरा डबल हेडर आहे. दिल्ली आणि कोलकाता आयपीएलच्या (IPL) 13व्या मोसमातील एक संतुलित संघांपैकी एक आहे, त्यामुळे या दोन सेट संघांमधील सामना जोरदार रंजक ठरणार आहे. आयपीएल 2020 मध्ये दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल बोलताना दोन्ही संघांनी आजवर त्यांच्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. त्याशिवाय या मोसमात आतापर्यंत दोन्ही संघांना एक पराभव पत्करावा लागला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये दिल्लीचा संघ 4 (+0.483) गुणांसह दुसरे स्थान काबीज केले आहे, तर दिनेश कार्तिकच्या नेतृत्वातील कोलकाता संघ 4 (+0.117) गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. (IPL 2020: शुभमन गिल ते संजू सॅमसन; इंडियन प्रीमियर लीग 13 मध्ये 'हे' 5 युवा फलंदाज UAEमध्ये गाजवत आहे मैदान)
कोरोना व्हायरसमुळे यंदा आयपीएलचा 13वा हंगाम भारताऐवजी युएईमध्ये खेळला जात आहे. जर आपणास काही कारणास्तव टीव्हीवर आयपीएलचा आनंद घेता येत नसेल तर आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएलची मजा घेऊ शकता. डिस्नी+ हॉटस्टारवर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आजचा सामना आपण पाहू शकता. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
आपल्या मोबाइल फोनमध्ये हॉटस्टार डाउनलोड कसे करावे:
1. मोबाइलमध्ये हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. पहिले आपल्या मोबाइलच्या प्ले-स्टोअरवर जा आणि तेथे हॉटस्टार शोधा.
2. नंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जा आणि आपल्या फोनमध्ये अॅप इन्स्टॉल करा.
3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या अॅप्स मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर आपल्याला हॉटस्टार अॅप चिन्ह दिसेल.
4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अॅप उघडू शकता.
5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहू शकता.
हॉटस्टार हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्याच भाषांमध्ये उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतचे व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)