How To Download Hotstar & Watch RR Vs DC Live Match: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
आयपीएलच्या 13व्या सत्राचा 23वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात शारजाह येथे खेळला जाणार आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्हीला टीव्हीवर आयपीएलचे सामने पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण हॉटस्टार अॅपवर आयपीएल लाईव्ह पाहू शकता. डिस्नी+हॉटस्टारवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे.
आयपीएलच्या (IPL) 13व्या सत्राचा 23वा सामना आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल (Delhi Capitals) यांच्यात शारजाह (Sharjah) येथे खेळला जाणार आहे. सलग 3 सामने गमावल्यानंतर राजस्थान पुन्हा विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. राजस्थानने या मोसमात आतापर्यंत 5 सामने खेळले त्यापैकी दोन जिंकलेले समाने शारजाह येथे खेळले गेले होते. दुसरीकडे, दिल्ली हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी येण्याच्या निर्धारित असेल. दिल्लीचे फलंदाज आणि गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. राजस्थान रॉयल्सची फलंदाजी आघाडीच्या 3 फलंदाजांवर अवलंबून आहे. संघाला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर आणि संजू सॅमसन यांच्यावर असेल. शारजाह येथे खेळल्या गेलेल्या मागील सामन्यात संघांनी मोठी धावसंख्या उभारली होती, त्यामुळे आजच्या सामन्यात देखील दोन्ही टीम विजयासाठी मोठी-आव्हानात्मक धावसंख्या करू पाहत असेल. (RR vs DC, IPL 2020 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील सर्वात लोकप्रिय आयपीएल, यंदा युएईमध्ये आयोजित करण्यात आली आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्हीला टीव्हीवर आयपीएलचे सामने पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण हॉटस्टार अॅपवर आयपीएल लाईव्ह पाहू शकता. हॉटस्टार यंदा आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+हॉटस्टारवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रसारित केला जाईल.हॉटस्टार डाउनलोड करण्याच्या सोप्प्या स्टेप्स-
- प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.
- यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.
- इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अॅप चिन्ह दिसेल.
- यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अॅप उघडू शकतात.
- साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.
हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2020 04:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

